अशोक आंबेडकर
अशोक मुकूंदराव आंबेडकर (१९५० - ८ डिसेंबर २०१७) हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक कार्यकर्ता व राजकारणी होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत नातू होते. ते भारतीय बौद्ध महासभेचे माजी विश्वस्त व अध्यक्ष होते. या संघटनेचे माध्यमातून त्यांनी सामाजिक व बौद्ध धर्माच्या प्रचार व प्रसाराचे काम केले.[१][२][३]
अशोक आंबेडकर हे बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांचे पुत्र होत. त्यांना राजरत्न व संदेश ही दोन मुले होत. बाबासाहेबांचे सख्खे नातू प्रकाश आंबेडकर व त्यांच्यात भारतीय बौद्ध महासभेवरील विश्वस्तपदावरून वाद झाले होते. न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागला असून भारतीय बौद्ध महासभेचे आपणच अध्यक्ष आहोत, असा अशोक आंबेडकर यांचा दावा होता. त्यांनी काही काळ भारतीय रिपब्लिकन पक्षातही काम केले होते. त्यांच्या निधनानंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष त्यांचे पुत्र राजरत्न आंबेडकर हे बनले, जे आत्तापर्यंत त्या पदावर कायम आहेत.[४][५][६]
अशोक आंबेडकर हे अंधेरी येथे वास्तव्यास होते. ८ डिसेंबर २०१७ रोजी, वयाच्या ६७व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे त्यांचे निधन झाले. दादर येथील चैत्यभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.[७][८][९]
हे सुद्धा पहा
- आंबेडकर कुटुंब
- प्रकाश आंबेडकर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
संदर्भ
- ^ "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोक आंबेडकर यांचे निधन". divyamarathi. 8 डिसें, 2017. 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "BR Ambedkar's Grand-Nephew Ashok M Ambedkar Dead". NDTV.com. 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "अशोक आंबेडकर यांचे निधन | Saamana (सामना)". 2020-11-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोक आंबेडकर यांचे निधन". divyamarathi. 8 डिसें, 2017. 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.

मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)