Jump to content

अव्यय

अव्यय ही व्याकरणातील एक संकल्पना आहे. अव्यय ही संज्ञा संस्कृत व्याकरणाच्या परंपरेतून आली आहे. अव्यय म्हणजे जे बदलत नाही ते. व्याकरणात शब्दांचे त्यांत होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने गट करण्यात येतात. व्याकरणानुसार शब्दांना होणारे विकार हे लिंग, वचन, विभक्ती अशा तीन संदर्भात होतात. नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण ह्यांची सामान्यरूपे होतात. अव्ययांची सामान्य रूपे होत नाहीत.अव्ययला अविकारी शब्द ही म्हणतात.वर.

कार्यानुसारी वर्गीकरण

मराठी व्याकरणाच्या परंपरेत अव्ययांचे त्यांच्या कार्यानुसार आणखी वर्गीकरण करण्याची परंपरा आहे.

शब्दयोगी अव्यय (Preposition)

  • शब्दाला जोडून येणारे अव्यय.

उदा० लिहिण्यासाठी, कामामुळे , होण्यापूर्वीउदा.....👇👇 काम पूर्ण होण्यापूर्वी तो निघून गेला. सरिता प्रत्येक कार्यक्रमासाठी तत्पर असते.

क्रियाविशेषण अव्यय ( Adjective )

  • क्रियेविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात
    • "तो जोरात पळाला.." या वाक्यात "जोरात" हा शब्द ...
    • "तो हळूहळू चालतो.." या वाक्यात "हळूहळू" हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे.

उभयान्वयी अव्यय ( Conjunction )

  • दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात.
    • "आणि" , "व" , "पण", "परंतु","कारण"

केवलप्रयोगी अव्यय ( Interjection )

   अगगं
   अगं आई
   अगई
   अगंबाई
   अगा
   अगाई
   अगे
   अगो
   अच्छा
   अच्छे
   अजी 
   अबब
   अबा बाबा बा
   अयाई
   अयाया    
   अय्या  
   अरारा  
   अरा रारा रारा रा
   अरे
   अरेच्च्या
   अरे देवा
   अरे बाप रे
   अरे माझ्या गब्रू
   अरे माझ्या पठ्ठ्या
   अरेरे 
   अरे वा   
   अरेव्वा
   अलल
   अंहं
   अहा
   अहाहा
   अहो
   अहोहो

   आई
   आई आई 
   आई गं
   आतागं बया
   आता बोला
   आहा
   आई माझे 

   इश्श

   ई
   ईई


  उं
  उंहूं

   ऊं

   ओ
   ओच्या
   ओय
   ओहो
   ओहोहो
   आऊच

   काय
   काय बोलणार

   खाशी

   गप
   गपचीप

   घ्या

   चप
   चीप
   चूप

  छट्‌
  छत्‌
   छि
   छिः
   छिछि
   छित
   छी
   छीछी
   छू:
   छे

   जी
  जी हां

  झॅक   
  छकास 
  झक्कास

   ठीक

   ढ्याण्टढ्यां

  ‍थत्‌
  थुत्‌
  थूः

   देवा
   देवा रे देवा


   धन्य
   धिक्‌
   धुत्‌

   नेतिनेती

   फक्क्ड
   फस्‌    
   फस्सक्लास
   फिश्श
   फुस्‌
   फूं
   फें

   बा
   बाप रे
   बाप रे बाप
   बाई गं

   भलतेच
   भले भले
   भले शाबास

   मार डाला
   मारू

   यंव
   यंव रे पठ्ठ्या

   रामारामा
   रामा शिवा गोविंदा
   राम राम राम 

   वा
   वाऽरे
   वारे वा
   वावा
   वाव्वा
   व्वा
   वाहवा
   वाहा

   शाबास
   शिवशिव
   शुक्‌
   शुकशुक
   शू

   हं
   हां
   हाय
   हायहाय
   हायरे
   हाशहुश
   हाश्शहुश्श
   हिडिस्‌
   हुः
   हुं    
   हुर्रे
   हूं
   हे
   हो
   होब्बाई
   होब्बुवा
   होय
   हाश

संस्कृत

सदृशं त्रिषु लिङ्गेषु सर्वासु विभक्तिषु ।
वचनेषुच सर्वेषु यन्न व्येति तदव्ययम् ।।

तीनही लिंगामध्ये, सर्व विभक्तीत, तसेच तीनही वचनांमध्ये ज्याचे रूप एकच असते, व ज्याच्यात काहीही बदल घडून येत नाही त्याला अव्यय असे म्हणतात. परंतु अशा अव्ययांना जोडीदार म्हणून विशिष्ट विभक्तिप्रत्यय लावलेले शब्दच लागतात.[]

संदर्भ