अविनाश जोगदंड
अविनाश जोगदंड (३० नोव्हेंबर, इ.स. १९७३) हे एक मराठी उद्योजक आहेत.
यांचा जन्म वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील आमखेडा या दुष्काळी गावात झाला.
यांचेचे आठवीपर्यंतचे शिक्षण आमखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. दहावी नंतर त्यांनी अकोल्याला इलेक्ट्रोपॅथीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला परंतु ते पूर्ण न करता त्यांनी पुण्यात कंत्राटदाराकडे सुपरवायझरचे काम केले. इमारत बांधणीचे काम करणाऱ्या मजूरांचा वेळ वाया जाऊ नये या साठी जोगदंड यांनी कामाच्या वेळेआधीच साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांचे दुपारच्या जेवणाचे डबे एकत्र करणे अशा युक्त्या केल्या. हे काम त्यांनी विनामोबदला केले. त्याच वेळी त्यांनी एम.ई. तसेच एम.पी.जी या पदव्या मिळवल्या
गव्हर्नन्स ऑफ गव्हर्मेंट हाही अभ्यासक्रम पुरा केला.
खूप प्रयत्नांनंतर अविनाशला पुण्याजवळ भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम मिळाले. मग वीज मंडळाची उपकेंद्रे व केंद्रे उभारण्याची कामे त्यांना मिळू लागली.
कंपनीची स्थापना
१९९४ मध्ये अविनाश व त्याच्या काकाने रामेलेक्स प्रायव्हेट लिमिटेड ही वीजवहनाच्या क्षेत्रातील कामे करणारी कंपनी स्थापन केली.
येथे त्यांनी वीज वाहून नेताना होणारी हानी टाळण्यासाठी कॉम्प्रेशन टाइप क्लॉप्स ॲन्ड कंडक्टर ही सुधारणा राबवली.