अवा वाळूचे स्तंभ
अवाचे मातीचे स्तंभ, ज्याला अवा सँड पिलर किंवा अवा नो डबान असेही म्हणतात. हे जपानमधील अवा, टोकुशिमा प्रांतात वाळूचा खडक आणि खडी या पासून बनलेला एक प्रकार आहे. ही रचना त्सुचिया ताकाकोशी प्रांतातील नैसर्गिक उद्यानात आहे. अंदाजे १.२ दशलक्ष वर्षांपूर्वी त्याची निर्मीती झाली असावी. ही निर्मीती जपानच्या नैसर्गिक संपत्तीच्या यादीत समाविष्ट आहे.
वर्णन
अवा येथे पाहिले गेलेले मातीचे खांब हुडो प्रकारचे आहेत्. यात खडकाचे पातळ स्पायर्स आहेत जे असामान्य आकाराचे आहेत. इतर रॉक फॉर्मेशन्सपेक्षा विरुद्ध प्रकारे तयार होतात. यात मुलायम खडकांवर कठिण प्रकारचा खडक तयार होतो तेव्हा हूडोज तयार होतात. यात वारा, पाऊस आणि इतर नैसर्गिक प्रक्रियेमुळे हळूहळू दगड झिजतो ज्यामुळे वर असलेला कठिण खडक मऊ खडकावर "टोपी" सारखा दिसायला लागतो. आणि शंकू किंवा आधारस्तंभ तयार होतो. मऊ खडकाच्या सततच्या झिजमुळे टोपी अस्थिर होते आणि अखेरीस ती खाली पडते. यामुळे उर्वरित खांबदेखील झिजायला लागतो. [१]
त्सुचिया ताकाकोशीच्या नैसर्गिक पार्क मध्ये, हुडोमध्ये प्राचीन खडी आणि वाळुपासून तयार झालेले थर दिसून येतात. योशिनो नदीच्या पाण्यातून आलेल्या मातीमुळे हे तयार झाले आहे. ही माती येथील बहुतेक क्षेत्रात दीसून येते. नदीतील पाण्याच्या कमी वेगामुळे नदीत जमा झालेले कॉम्पॅक्ट खडी अनियमित खडक तयार करते. अवा हूडूसचे आकार वेगवेगळे आहेत; काही छोटे खांब १० मीटर (३३ फूट) उंच आहेत, तर सर्वात मोठे ("वडाकुटो" असे नाव असलेले) ९० मीटर (३०० फूट) उंच आहेत. अवा येथील हूडू जगातील अशा तीन स्वरूपांपैकी एक आहेत, इतर दोन रॉकी पर्वत आणि टायरोलमध्ये आहेत . [२] [३] [४] [५]
या निर्मीतीची पहिली नोंद ८०० एडी मधील आहे. मे १९३५ मध्ये या इर्मीतीला नैसर्गिक संपत्तीची पदवी दिली गेली, [३] आणि नंतर त्सुचिया ताकाकोशी प्रीफेक्चुरल प्राकृतिक पार्कमेध्ये समाविष्ट केली गेली . ही साइट टोकुशिमाची मधील ८८ दृश्यांपैकी एक आहे . [५]
संदर्भ
- ^ Bruthans, Jiri; Soukup, Jan; Vaculikova, Jana; Filippi, Michal; Schweigstillova, Jana; Mayo, Alan L.; Masin, David; Kletetschka, Gunther; Rihosek, Jaroslav (July 2014). "Sandstone landforms shaped by negative feedback between stress and erosion". Nature Geoscience. 7 (8): 597–601. doi:10.1038/ngeo2209. ISSN 1752-0908
- ^ "The "Earth Pillars of Awa"! A Mysterious Phenomena Found in Only 3 Places Worldwide!". Stouchi Finder (इंग्रजी भाषेत). 2018-11-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ a b Linkclub, リンククラブ. "日本吉 - NIPPON-KICHI". nippon-kichi.jp (जपानी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "JR Rent-A-Car|Popular spot". www.ekiren.co.jp (जपानी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ a b PDF (in Japanese) attributed to the Tokushima Education Board of Education and Culture. URL: http://awabunka.tokushima-ec.ed.jp/%E3%81%82%E3%82%8F%E6%96%87%E5%8C%96%E3%83%86%E3%82%AD%E3%82%B9%E3%83%88%E3%83%96%E3%83%83%E3%82%AF/?action=common_download_main&upload_id=309