Jump to content

अवध एक्सप्रेस

वांद्रे-गोरखपूर अवध एक्सप्रेस
वांद्रे-मुझफ्फरपूर अवध एक्सप्रेस

अवध एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वेसेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी आठवड्यातून ४ वेळा मुंबई ते गोरखपूर दरम्यान तर उर्वरित तीन वेळा मुंबई ते मुझफ्फरपूर दरम्यान धावते. १९०३७/१९०३८ अवध एक्सप्रेस मुंबईच्या वांद्रे टर्मिनस ते गोरखपूरच्या गोरखपूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावते तर १९०३९/१९०४० अवध एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस ते बिहारमधील मुझफ्फरपूरच्या मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावते.

ऐतिहासिक अवध प्रांतावरून ह्या गाडीचे नाव पडले आहे. ही गाडी सुरत, रतलाम, कोटा, आग्रा, कानपूर, लखनौ ह्या मार्गावरून धावते.

तपशील

गाडी क्रमांक मार्ग अंतर प्रस्थान आगमन कधी
१९०३७मुंबई वांद्रे – गोरखपूर१८४५ किमी२२:४०१३:४५रवि, मंगळ, बुध, शुक्र
१९०३८गोरखपूर – मुंबई वांद्रे१३:२००४:३५सोम, बुध, शुक्र, शनि


गाडी क्रमांक मार्ग अंतर प्रस्थान आगमन कधी
१९०३८मुंबई वांद्रे – मुझफ्फरपूर२१५५ किमी२२:४०२१:५०सोम, गुरू, शनि
१९०४०मुझफ्फरपूर – मुंबई वंद्रे०६:०००४:३५सोम, बुध, शुक्र, शनि

बाह्य दुवे