Jump to content

अळू

अळूची पाने

अळू (शास्त्रीय नाव : Colocasia esculenta, कलोकेशिया एस्क्युलेंटा ; इंग्लिश: Taro, टॅरो ;) ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती आहे. मुळात आग्नेय आशियातली ही वनस्पती आता आफ्रिकाआशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये सर्वत्र आढळते. अळू बारमाही उगवणारा असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात. अळू ही एक औषधी वनस्पती मानली जाते. मराठवाड्यात अळूला 'चमकोरा/चमकुरा' असे पण म्हणतात.

उपयोग

खाद्यपदार्थांमधील उपयोग

महाराष्ट्रात लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात. त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. अळूच्या पानांवर हरबऱ्याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना गुजरातमध्ये पात्रा म्हणतात. उपवासाच्या दिवशी अळूचे कंद उकडून खातात. या कंदांना अळकुडी असे नांव आहे. गुजराथीत आरवी असे म्हणतात. भाजीचा अळू, वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे याचे तीन मुख्य प्रकार आहेत. अळूच्या पानाच्या मधोमधून पिवळे फुल येते.

अळूच्या देठापासून "*देठी*" हा पदार्थ बनवला जातो. अळूचे देठ सोलून त्याचे लहान तुकडे करावे. ते कुकरमध्ये वाफवून घ्यावेत. त्यानंतर ते थंड झाल्यावर हाताने कुस्करावे.त्यात गुळ,कांदा बारीक चिरून,हळद,मीठ,तिखट व दही घालावे. नंतर सर्व मिश्रण एकजीव करून वाढावे. हा पदार्थ जेवणापूर्वी खूप आधी करून ठेवू नये.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  • आप्पाशास्त्री साठे, "घरगुती औषधे", आयुर्वेद भवन: १९८८, पृष्ठ १२

बाह्य दुवे