अल्सास (फ्रेंच: Alsace) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पूर्वे भागात जर्मनी व स्वित्झर्लंडच्या सीमेजवळ ऱ्हाईन नदीच्या पश्चिम काठावर वसला असून तो फ्रान्सच्या संलग्न २२ प्रांतांपैकी आकाराने सर्वात लहान आहे. स्त्रासबुर्ग ही अल्सासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. म्युलुझ हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
अल्सास प्रदेश बास-ऱ्हिन व हाउत-ऱ्हिन ह्या दोन प्रशासकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे. २०१६ साली अल्सास, लोरेन व शांपेन-अॅर्देन हे तीन प्रदेश एकत्रित करून ग्रांद एस्त नावाच्या नवीन प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.