Jump to content

अल्केमी

अल्केमी किंवा किमया (अरबी: "अल-किमिया" - देवाची किमया) - धातूंचे सोन्यात रूपांतर करण्याच्या तथाकथित प्रक्रियेला अल्केमी म्हणतात.

अल्केमी या संज्ञेचा संक्षिप्त इतिहास :

अल्केमी या संज्ञेचाचा जन्म प्राचीन इजिप्तमध्ये झाला होता, जिथे 'खेम' हा शब्द नील नदीच्या सभोवतालच्या पूर मैदानाच्या सुपीकता संदर्भात वापरला जात होता. इजिप्शियन लोकांचा मृत्यू नंतरच्या जीवनावरील असणारा विश्वास, आणि त्यांनी ममी तयार करण्यासाठी (mummification) विकसित केलेल्या प्रक्रियेमुळे रसायनांबद्दलचे प्राथमिक ज्ञान निर्माण झाले. अलेक्झांडर द ग्रेट याने इ. स. वि. पू. ३३२ मध्ये इजिप्त जिंकल्यानंतर, ग्रीकचे तत्त्वज्ञानी लोक इजिप्शियन पद्धतींमध्ये रस घेऊ लागले. त्यातूनच 'खेमिया' हा इजिप्तबद्दलचा ग्रीक शब्द तयार झाला. जेव्हा 7th व्या शतकात इजिप्तवर अरबांचा ताबा होता तेव्हा त्यांनी खेमिया या शब्दामध्ये 'अल-' जोडला आणि 'अल-खेमिया' म्हणजे 'ब्लॅक लॅंड', हा शब्द आता अल्केमी शब्दासाठी संभाव्य मूळ म्हणून पाहिला जातो. ग्रीक शब्द 'Khumos', ज्याचा अर्थ 'द्रव पदार्थ' आहे हे अल्केमी शब्दासाठी वैकल्पिक मूळ म्हणून सूचित केले गेले आहे. परंतु, अद्याप या बाबतीत एकमत झाले नाही.

इजिप्तप्रमाणे, चीन आणि भारतात देखील अल्केमी स्वतंत्रपणे विकसित केली गेली. चिनी भिक्खूंनी आयुष्य वाढवू शकतील अशी खनिजे, वनस्पती आणि त्यांचे मिश्रण शोधले आणि विकसित केले. भारतात देखील काहिसे अशाच प्रकारची अल्केमी विकसित केली गेली. भारतीयांनी त्यांच्या कामात स्टीलचा शोध लावला आणि त्यांनी Bunsen आणि Kirchhoff's यांच्या कामाच्या खूप आधी, ज्योतीच्या रंगाचे महत्त्व कळले होते. ज्योतीच्या रंगावरून धातूंची ओळख करता येते हे भारतीयांनी माहित होते.

युरोपमध्ये, अल्केमीमुळे एकत्रित उत्पादन आणि इतर अनेक रासायनिक प्रक्रियांमध्ये प्रगती आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेले उपकरणे शोधले गेले. अखेरीस, सोळाव्या शतकापर्यंत, युरोपमधील अल्केमी तज्ञ दोन गटात विभागले गेले होते.

पहिल्या गटाने नवीन संयुगे आणि त्यांच्या प्रतिक्रियांच्या शोधावर लक्ष केंद्रित केले - यामुळे आताचे रसायनशास्त्र निर्माण झाले.

दुसरा अमरत्व आणि मुळ धातूंचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी शोध चालू ठेवत, अल्केमीची अधिक आध्यात्मिक, आधिभौतिक बाजू पाहत राहिला.


[]

  1. ^ "अल् केमी या संज्ञेचा इतिहास".