Jump to content

अल्क धातू

लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम व सीझियम या अल्क धातूंचे प्रयोगशाळेतील नमुने

अल्क धातू[] (अन्य नामभेद: अल्कली धातू ; इंग्लिश: Alkali metal , अल्कली मेटल ;) हे आवर्त सारणीमधील एकसंयुजी, धनविद्युतभारी धातूंना उद्देशून योजले जाणारे समूहवाचक नाव आहे. यांच्या इलेक्ट्रॉन-रचनेत बाहेरील कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतो. त्यामुळे हे धातू अतिशय विक्रियाशील असतात. आवर्त सारणीमधील इतर मूलद्रव्यांप्रमाणे या गटातील मूलद्रव्येही एकमेकांसारखे गुणधर्म दाखवतात.

या गटातील धातू खालीलप्रमाणे व वाढत्या अणुभाराप्रमाणे त्यांच्या गुणधर्मांत होणारा बदल खालील तत्क्यात दाखवला आहे :

Zमूलद्रव्यइलेक्ट्रॉन रचना
हायड्रोजन
लिथियम२,१
११सोडियम२,८,१
१९पोटॅशियम२,८,८,१
३७रुबिडियम२,८,१८,८,१
५५सीझियम२,८,१८,१८,८,१
८७फ्रान्सियम२,८,१८,३२,१८,८,१

अल्कली धातू वाढत्या अणुक्रमांकाप्रमाणे गुणधर्मात बदल दाखवतात. उदाहरणार्थ, त्यांची विद्युतऋणता कमी होत जाते; विक्रियाशीलता वाढत जाते; विलयबिंदू व उकळणबिंदू वाढत जातो; घनता वाढत जाते. पोटॅशियम व फ्रांसियम हे धातू याला अपवाद आहेत; त्यांची घनता अनुक्रमे सोडियम व सीशियम यांपेक्षा कमी असते.

अल्क धातूअणुभारविलयबिंदू (के)उकळणबिंदू (के)घनता (ग्रा·सेंमी−३)विद्युतऋणता (पॉलिंग)
लिथियम६.९४१४५३१६१५०.५३४०.९८
सोडियम२२.९९०३७०११५६०.९६८०.९३
पोटॅशियम३९.०९८३३६१०३२०.८९०.८२
रुबिडियम८५.४६८३१२९६११.५३२०.८२
सीझियम१३२.९०५३०१९४४१.९३०.७९
फ्रान्सियम(२२३)२९५९५०१.८७०.७०

संदर्भ

  1. ^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. p. १०.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत