अलॉइस सेनेफेल्डर
अलॉइज सेनेफेल्डर (१७७१-१८३४) या बव्हेरियन मुद्रक आणि संशोधकाचा जन्म प्रेग(झेकोस्लाव्हाकिया) येथे झाला. हा एक यशस्वी नट आणि नाटककार होता. इ.स. १७९६ मध्ये तेलकट खडूने ओल्या दगडावर लिहिताना त्याला अचानक शिळामुद्रणाची युक्ती सुचली. अनेक प्रयत्नांनंतर छपाई जमायला लागल्यावर त्याने म्युनिच येथे स्वतःचा शिळाप्रेस काढला. तो पुढे तेथील रॉयल प्रिंटिग प्रेसचा संचालक झाला. त्याने ऑफेनबाख(Offenbach) येथे मुद्रणकला शिकवण्यासाठी एक संस्था काढली.