अलेक्सांद्रा वॉझ्नियाक
अलेक्सांद्रा वॉझ्नियाक (फ्रेंच: Aleksandra Wozniak; ७ सप्टेंबर, इ.स. १९८७:[[मॉंत्रियाल[[]],]] कॅनडा - ) ही एक कॅनेडियन महिला टेनिस खेळाडू आहे. २००५ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी वॉझ्नियाक सध्या महिला एकेरी क्रमवारीत ६५व्या स्थानावर आहे. २००८ साली स्टॅनफर्ड विद्यापीठामधील एकेरी स्पर्धा जिंकून ती २० वर्षांनंतर डब्ल्यूटीए स्पर्धा जिंकणारी कॅनेडियन तर सर्वात पहिली क्वेबेक रहिवासी आहे. जून २००९ मध्ये वॉझ्नियाक जागतिक क्रमवारीत २१व्या स्थानावर होती.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-10-08 at the Wayback Machine.
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर अलेक्सांद्रा वॉझ्नियाक (इंग्रजी)