Jump to content

अलेक्सांदर देस्प्ला

अलेक्सांदर देस्प्ला
२०१५ मध्ये अलेक्सांदर देस्प्ला
जन्म नाव अलेक्सांदर माईकल जेरार्ड देस्प्ला
जन्म २३ ऑगस्ट १९६१
पॅरीस , फ्रांस
राष्ट्रीयत्व फ्रेंच
कार्यक्षेत्रसंगीत, वादन, पार्श्वसंगीतकार, ऑर्केसट्रा कंडक्टर
पुरस्कार ऑस्कर पुरस्कार
संकेतस्थळAlexandredesplat.net

अलेक्सांदर माईकल जेरार्ड देस्प्ला (२३ ऑगस्ट, १९६१ - ) हे एक फ्रेंच संगीत दिग्दर्शक आणि संगीत संयोजक आहेत. त्यांना द ग्रांड बुडापेस्ट हॉटेल आणि द शेप ऑफ वॉटर ह्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक म्हणून दोन अकादमी पुरस्कार, ह्या व्यातीरीक्त त्यांना अकादमी पुरस्काराची ९ नामांकने मिळाली आहेत, ३ सीझर पुरस्कार आणि ९ नामांकाने, ३ बाफ्टा पुरस्कार आणि १० नामांकने, २ गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि ११ नामांकने आणि २ ग्रामी पुरस्कार आणि १० नामांकने मिळाली आहेत.[]

देस्प्ला ह्यांनी आत्तापर्यंत लोकप्रिय चित्रपटांसाठी आणि कमी बजेट असलेल्या चित्रपटांसाठीदेखील संगीत दिग्दर्शन आणि संयोजन केले आहे. द क्वीन, द गोल्डन कम्पास, द क्युरीयस केस ऑफ बेन्जॅमिन बटन, द ट्वायलाईट सागा: न्यू मून, फॅन्टास्टीक मिस्टर फॉक्स, हॅरी पॉटर अंॅड द डेथली हॅलोज- पार्ट १ अंॅड २, लिटील विमेन, द किंग्स स्पीच, द डॅनिश गर्ल, द इमिटेशन गेम, मूनराईज किंग्डम, आरगो, राईज ऑफ द गर्डीयन्स, झीरो डार्क थर्टी, द मिडनाईट स्काय, गॉडझीला, अनब्रोकन, द सीक्रेट लाईफ ऑफ पेट्स आणि द आईल ऑफ डॉग्स हे त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांमधील काही आहेत.[]

सुरुवातीचे आयुष्य

देस्प्ला ह्यांनी वयाच्या चौथ्यावर्षापासून पियानो शिकायला आणि वाजवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ट्रमपेट आणि बासरी वाजवायला सुरुवात केली. त्यांना लहान वयापासूनच चित्रपट संगीताबद्दल आकर्षण होते. त्यांनी बरनार्ड हर्मन ह्यांचे हीचकॉक ह्यांच्या चित्रपटातील संगीत ऐकायला सुरुवात केली. देस्प्ला ह्यांनी जॉन विल्लीयम्स ह्यांचे स्टार वॉर्स ह्या चित्रपटातील संगीत ऐकल्यानंतर संगीत दिग्दर्शक म्हणून काम करायचे ठरवले.देस्प्ला १९८० च्या दशकापासून चित्रपट सृष्टीत काम करत आहेत. पण २००३ सालच्या गर्ल विथ अ पर्ल इयररिंग ह्या चित्रपटाचे संगीत श्रोत्यांना विशेष आवडले.

कारकीर्द

देस्प्ला ह्यांनी मुख्य काम फ्रेंच चित्रपट आणि नाटक सृष्टीमध्ये आणि हॉलीवूडमध्ये केले आहे. १०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. लॅप्स ऑफ मेमरी (१९९२), फॅॅमिली एक्स्प्रेस (१९९२), रेगार्द ले हॉमेस तोम्बर(१९९४), ले पेशेस मोर्तेल्स (१९९५), द बीट दॅॅट माय हार्ट स्किप्ड (२००५), फॅनटॅस्टिक मिस्टर फॉक्स (२००९), हॅरी पॉटर अंॅड द डेथली हॅलोज- पार्ट १ अंॅड २ (२०१०) आणि द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल (२०१४) हे चित्रपट त्यापैकी काही आहेत.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Alexandre Desplat - Biography". www.alexandredesplat.net. 2021-06-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Alexandre Desplat". IMDb. 2021-06-20 रोजी पाहिले.