Jump to content

अलेक्झांड्रा, रशिया

अलेक्झांड्रा फेदोरोव्ना तथा हेसेची ॲलिक्स (६ जून, इ.स. १८७२:डार्मश्टाट, जर्मनी - १७ जुलै, इ.स. १९१८:इपातियेवचे घर, येकातेरिनबुर्ग, रशिया) ही रशियाचा शेवटचा झार निकोलस दुसऱ्याची पत्नी होती. ही युनायटेड किंग्डमची राणी व्हिक्टोरियाची नात होती. अलेक्झांड्रा ग्रिगोरी रास्पुतिनची भक्त होती.

१९१७ च्या बोल्शेविक क्रांतीनंतर अलेक्झांड्रा, निकोलस आणि त्यांचे जवळचे कुटुंब येकातेरिनबुर्गमध्ये लपून बसले असताना बोल्शिविकांनी त्यांना धरले व गोळ्या घालून ठार मारले.