अलेक्झांडर फ्लेमिंग
अलेक्झांडर फ्लेमिंग | |
---|---|
जन्म | अलेक्झांडर फ्लेमिंग ६ ऑगस्ट इ.स. १८८१ लोकफेल्ड, स्कॉटलॅंड |
मृत्यू | ११ मार्च इ.स. १९५५ लंडन |
चिरविश्रांतिस्थान | सेंट पॉल कॅथेड्रल लंडन |
राष्ट्रीयत्व | स्कॉटिश |
शिक्षण | MBBS |
प्रशिक्षणसंस्था | इन्पेरिअल कॉलेज लंडन |
पेशा | वैद्यकीय |
प्रसिद्ध कामे | पेनिसिलिनचा शोध |
धर्म | ख्रिस्ती |
जोडीदार | सारा मारियान व आमेलिया |
वडील | हयुज फ्लेमिंग |
आई | ग्रेस |
पुरस्कार | नोबेल पारितोषिक इ.स. १९४५ |
स्वाक्षरी |
सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. (जन्म ६ ऑगस्ट १८८१ - म्रुत्यु ११ मार्च १९५५). त्यांनी केलेल्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[१] त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते. परंतु त्याचवेळेस हे कल्चर का मृत झाले याबद्दल जीज्ञासा निर्माण झाली व पेनिसिलीन ही बुरशी जीवाणूंसाठी मरण आहे हे लक्षात आले व प्रतिजैविकांचा शोध लागला.
फ्लेमिंग यांनी जीवाणूशास्त्र, केमोथेरेपी यांवरती अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "The Nobel Prize in Physiology or Medicine 1945" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)