Jump to content

अलेक्झांडर ड्युमा

अलेक्झांडर ड्युमा तथा ड्युमा डेव्ही दि ला पैयेत्री (२४ जुलै, १८०२:व्हियेस कॉतेरेत, ऐस्ने, फ्रांस - ५ डिसेंबर, १८७०:डियेप्पे, सीन-मॅरिटाइम, फ्रांस) हे फ्रेंच लेखक होते. फ्रेंच लेखकांपैकी अग्रगण्य मानले जाणाऱ्या ड्युमांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या ज्यांत ल कॉम्टे दि मॉंटे क्रिस्टो (मॉंटे क्रिस्टोचा काउंट, लेस त्रुआ मूस्केतेर्स (तीन मस्केटियर), व्हिंट आन्स आप्रेस (वीस वर्षांनी), ल व्हिकॉम्टे दि ब्रॅगेलॉन:ऊ दि आन्स प्लु तार्द (ब्रॅगेलॉनचा व्हायकाउंट: दहा वर्षांनंतर) यांचा समावेश आहे. ड्युमाच्या अनेक कादंबऱ्या इतिहासात रचलेल्या असायच्या. त्यातील अनेक घटना कल्पित असल्या तरी त्यांना अनेकदा ऐतिहासिक बाज आहे. ड्युमाने लिहिलेल्या पुस्तकांवर २०० पेक्षा अधिक चित्रपट निर्माण केले गेले आहेत.

ड्युमाने आपले लेखन नाटकांपासून सुरू केले. त्याने अनेक वृत्तपत्रांतूनही लिखाण केले तसेच प्रवासवर्णनेही लिहिली. त्याच्या अनेक कादंबऱ्या नियतकालिकांमधून क्रमशः प्रकाशित झाल्या. ड्युमाचे प्रकाशित साहित्य अंदाजे १,००,००० पानांच्या जवळपास आहे.