अलुतेदार
अलुतेदार हा अठरा जातींचा समूह आहे. यांचे महाराष्ट्रातील प्रमाण ३०% पेक्षा अधिक आहे, आणि हा इतर मागास वर्ग (ओबीसी)मध्ये मोडतो. अलुतेदारांनाच ’नारू’ म्हणतात.
या अठरा गाव कामगारांचा समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.[१]
अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी :
कळवंत, खाटीक, गोंधळी, घडशी, डावऱ्या, तराळ, तांबोळी, माळी, शिंपी, साळी, सोनार हे बारा अलुतेदार. तर काही ठिकाणी १२ अलुतेदारांची ही यादी कळवंत, घडशी, चौगुला, मुलाणा, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, माळी, साळी, सोनार अशी दिली आहे. याचा अर्थ असा की गावागावाप्रमाणे अलुतेदारांची यादी वेगवेगळी असे. पुन्हा प्रत्येक गावात हे सर्व अलुतेदार असतीलच असे नाही. एक नक्की की, अलुतेदार हे बलुतेदारांच्या मानाने दुय्यम असत.