अलीगढ
अलीगढ | |
उत्तर प्रदेशमधील शहर | |
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमधील एक मशीद | |
अलीगढ | |
अलीगढ | |
देश | भारत |
राज्य | उत्तर प्रदेश |
जिल्हा | अलीगढ जिल्हा |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ८,७४,४०८ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
अलीगढ हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर व अलीगढ जिल्हा आणि अलीगढ विभागाचे मुख्यालय आहे. अलीगढ शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात नवी दिल्लीच्या १४० किमी आग्नेयेस, आग्र्याच्या ८५ किमी उत्तरेस तर लखनौच्या २०० किमी नैऋत्येस वसले आहे. अलीगढ प्रामुख्याने येथील अलीगढ मुस्लिम विद्यापीठासाठी ओळखले जाते.
१ सप्टेंबर १८०३ रोजी दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धातील अलीगढची लढाई येथेच लढली गेली होती. २०११ साली ८.७४ लाख लोकसंख्या असलेले अलीगढ भारतामधील ५५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
वाहतूक
अलीगढ शहर भारतामधील इतर भागांसोबत महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे जोडले गेले आहे. हावडा-दिल्ली हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग अलीगढमधूनच जातो. राष्ट्रीय महामार्ग ९१ व ९३ अलीगढ शहरातून धावतात.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील अलीगढ पर्यटन गाईड (इंग्रजी)