अली खामेनेई
आयतोल्लाह सय्यद अली होसैनी खामेनेई (फारसी: آیتالله سید علی حسینی خامنهای; फारसी उच्चार: /ɒːjætollɒːh sejjed ʔæˈliː hosejˈniː xɒːmeneˈʔiː/) ( १७ जुलै १९३९) इराण देशाचे राजकारणी व धर्मगुरू आहेत. १९८९ सालापासुन ते इराणचे सर्वोच्च पुढारी (रहबरे एन्केलाब) आहेत. १९८१ ते १९८९ दरम्यान ते इराणचे राष्ट्राध्यक्ष होते.