Jump to content

अलप्पुळा


Sun rise view Alleppey backwaters , Kerala


अलप्पुळा
ആലപ്പുഴ
भारतामधील शहर


अलप्पुळा is located in केरळ
अलप्पुळा
अलप्पुळा
अलप्पुळाचे केरळमधील स्थान
अलप्पुळा is located in भारत
अलप्पुळा
अलप्पुळा
अलप्पुळाचे भारतमधील स्थान

गुणक: 9°29′24″N 76°19′48″E / 9.49000°N 76.33000°E / 9.49000; 76.33000

देशभारत ध्वज भारत
राज्य केरळ
जिल्हा अलप्पुळा
समुद्रसपाटीपासुन उंची ३ फूट (०.९१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,७४,१७६
  - महानगर २,४०,९९१
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


अलप्पुळा किंवा आलप्पुळ (लेखनभेद: अलेप्पी, मल्याळम: ആലപ്പുഴ) हे भारत देशाच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. अलप्पुळा शहर केरळच्या दक्षिण भागात राजधानी तिरुवनंतपुरमच्या १५५ किमी उत्तरेस तर कोचीच्या ६२ किमी दक्षिणेस अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०११ साली १.७४ लाख लोकसंख्या असलेले अलप्पुळा केरळमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

अलप्पुळा शहर एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथील कालवे व निसर्गरम्य खारकच्छांमुळे ह्यास पुर्वेकडील व्हेनिस (Venice of the East) असेही म्हणतात. वेंबनाड सरोवराच्या दक्षिण टोकास स्थित असल्यामुळे अलाप्पुळाहून निवासी बोटीमधून २-३ दिवसांची सफर हे येथील मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्ग ४७ हा केरळमधील प्रमुख महामार्ग अलप्पुळामधून जातो. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ७८ किमी दूर आहे. अलप्पुळा रेल्वे स्थानक एर्नाकुलम-कन्याकुमारी रेल्वेमार्गावर स्थित असून तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस, जन शताब्दी एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथे थांबतात.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत