Jump to content

अल अहसा मरूद्यान


अल अहसा मरूद्यान
स्थान सौदी अरेबिया
क्षेत्रफळ 8,544 ha
कारण सांस्कृतिक: (iii), (iv), (v)
सूचीकरण २०१८
नोंदणी क्रमांक1563

अल अहसा मरूद्यान हे जगातील सर्वात मोठे मरूद्यान आहे. हे सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील भागात, पर्शियन आखाताच्या किनाऱ्यापासून सुमारे ६० किमी (३७ मैल) अंतरावर आहे. २०१८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये या मरूद्यानाचा समावेश केला.[]

व्युत्पत्ति

अल अहसा हा "अल-हिसा" चे अनेकवचन आहे. याचा अर्थ घन पृष्ठभागावर जमा होणारी अशी वाळू, की जर पाऊस पडला तर ही वाळू सूर्यप्रकाशामुळे पाणी आटण्याला रोखेल आणि घन पृष्ठभाग या वाळूला बुडण्यापासून रोखेल. म्हणून ही जागा थंड असते.[]

इतिहास

अल अहसा हे प्रागैतिहासिक काळापासून वसलेले आहे, कारण म्हणजे येथे मुबलक प्रमाणात पाणी आहे आणि उर्वरित प्रदेश कोरडा आहे. या प्रदेशातील पाण्याचे नैसर्गिक झरे वाढत आले आहेत. प्रागैतिहासिक काळापासून मानवी वस्ती आणि शेतीविषयक प्रयत्नांना (विशेषतः पाम शेतीला) सहस्र वर्षांपासून प्रोत्साहित केले जात आहे. इ.स. १५५० मध्ये अल अहसा व जवळचा कटीफ प्रांत उस्मानी साम्राज्याच्या पहिल्या सुलेमानाच्या साम्राज्याखाली आले. इ.स. १६७०मध्ये, अल अहसामधून उस्मानी साम्राज्य बरखास्त झाले आणि हा प्रदेश बनी खालिद जमात प्रमुखांच्या अंमलाखाली आला.

अर्थव्यवस्था

ऐतिहासिकदृष्ट्या, अल-हसा हा अरबी द्वीपकल्पातील काही भात उत्पादक प्रदेशांपैकी एक होता. इ.स. १९३८ मध्ये दम्मम जवळ पेट्रोलियम साठा सापडला, ज्यामुळे या भागाचे जलद आधुनिकीकरण झाले. १९६० च्या दशकाच्या सुरुवातीस, रोजची उत्पादन पातळी ११ लाख बॅरल (१८०,००० घनमीटर)पर्यंत पोहोचली. आज (२०१९ साली) अल अहसामध्ये घावर फील्ड हे जगातील सर्वात मोठे पारंपरिक तेलाचे क्षेत्र आहे.

अल अहसा खजुरांसाठीही ओळखला जातो. येथे २० लाखांहून जास्त खजुराची झाडे आहेत. ती दर वर्षी १०० हजार टनांपेक्षा जास्त खजूर देतात..

याव्यतिरिक्त अल अहसा हे बिष्ट हा पुरुषांचा ऐतिहासिक व पारंपरिक पोशाख तयार करण्याच्या उच्च कौशल्यामुळे ओळखले जाते.

पर्यटन स्थाने

अल अहसा मरूद्यानामध्ये झऱ्यांची व गोड्या पाण्याच्या स्रोतांची संख्या ६० ते ७० पर्यंत आहे. त्या त्या भागाचे महत्त्व सांगणारी बरीच पुरातन स्थळे येथे आहेत.

अल अहसा मरूद्यानाच्या जागतिक वारसा स्थळामध्ये खालील १२ ठिकाणांचा समावेश केला गेला आहे:

  1. पूर्व मरूद्यान
  2. उत्तर मरूद्यान
  3. अस-सीफ
  4. कासार इब्राहिम महल
  5. सुक अल-कायसरिया
  6. कासार खुजम
  7. कासार साहूद
  8. जवथा पुरातत्त्व स्थळ
  9. जवथा मशीद
  10. अल-ओयुन गाव
  11. ऐन कन्नास पुरातत्त्व स्थळ
  12. अल-असफर तलाव

जवथा मशीद ही पूर्व अरबमध्ये बांधलेली सर्वात पूर्वीची मशिद होती आणि बहुतांश मूळ वास्तू आता उध्वस्त झाली आहे. तरीही हे स्थळ अद्याप प्रार्थना करण्यासाठी वापरले जाते. हे हिजरीच्या सातव्या वर्षी (इ.स. ६२९), किंवा इ.स. ६३६. बांधले होते. कासार इब्राहिम महल ही उस्मानी काळापासूनची मुख्य वास्तू आहे जी इ.स. १५५६ मध्ये बांधली गेली. ऐन कन्नास पुरातत्त्व स्थळ हे ६व्या किंवा ५व्या शतकाच्या दरम्यानचे आहे.

हवामान

अल अहसा साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 32.7
(90.9)
37.8
(100)
41.2
(106.2)
45.0
(113)
49.0
(120.2)
50.6
(123.1)
50.8
(123.4)
49.7
(121.5)
48.0
(118.4)
45.6
(114.1)
45.8
(114.4)
32.5
(90.5)
50.8
(123.4)
सरासरी कमाल °से (°फॅ) 21.2
(70.2)
24.2
(75.6)
28.9
(84)
35.1
(95.2)
41.5
(106.7)
44.4
(111.9)
45.7
(114.3)
45.4
(113.7)
42.3
(108.1)
37.6
(99.7)
29.9
(85.8)
23.4
(74.1)
35.0
(95)
दैनंदिन °से (°फॅ) 14.7
(58.5)
17.2
(63)
21.5
(70.7)
27.2
(81)
33.3
(91.9)
36.3
(97.3)
37.8
(100)
37.2
(99)
33.8
(92.8)
29.2
(84.6)
22.4
(72.3)
16.6
(61.9)
27.3
(81.1)
सरासरी किमान °से (°फॅ) 8.5
(47.3)
10.6
(51.1)
14.3
(57.7)
19.6
(67.3)
24.9
(76.8)
27.6
(81.7)
29.4
(84.9)
28.9
(84)
25.3
(77.5)
21.1
(70)
15.6
(60.1)
10.5
(50.9)
19.7
(67.5)
विक्रमी किमान °से (°फॅ) −2.3
(27.9)
1.0
(33.8)
0.7
(33.3)
7.3
(45.1)
17.0
(62.6)
18.3
(64.9)
19.8
(67.6)
19.7
(67.5)
17.3
(63.1)
13.0
(55.4)
5.8
(42.4)
0.8
(33.4)
−2.3
(27.9)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 15.0
(0.591)
11.6
(0.457)
16.2
(0.638)
10.7
(0.421)
2.1
(0.083)
0.0
(0)
0.0
(0)
0.9
(0.035)
0.0
(0)
0.6
(0.024)
5.1
(0.201)
21.1
(0.831)
83.3
(3.28)
सरासरी पर्जन्य दिवस 8.7 5.8 9.1 7.3 2.0 0.0 0.1 0.2 0.0 0.3 3.1 7.2 43.8
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 55 49 44 38 27 22 23 30 33 39 47 56 39
स्रोत: Jeddah Regional Climate Center[]

संदर्भ

  1. ^ "Al-Ahsa Oasis, an Evolving Cultural Landscape". UNESCO World Heritage. २०१८. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ "Definition and Meaning of الاحساء in Arabic Dictionary". ९ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ "Climate Data for Saudi Arabia". Jeddah Regional Climate Center. 2012-05-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 26, 2016 रोजी पाहिले.