Jump to content

अल-खोबर

अल-खोबर हे सौदी अरेबियातील मोठे शहर आहे. पूर्व प्रांतात इराणच्या आखाताच्या किनारी असलेले हे शहर दम्मम महानगराचा भाग असून २०१२मध्ये येथील लोकसंख्या ९,४१,३५८ होती.

सौदी आराम्को ही जगातील सगळ्यात मोठी खनिजतेल कंपनी येथे स्थित असून अल खोबरमधील मोठ्या प्रमाणातील लोक तेथे काम करतात.