Jump to content

अर्धांगी

अर्धांगी हा कौटुंबिक चित्रपट शानो मुव्हीज निर्मिती संस्थेसाठी निर्माती मधुमालती यांनी १९८५ साली निर्माण केला.[] या चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले असून ज्योत्स्ना देवधर यांच्या कथेवर तो आधारित आहे.

चित्रपटाची पटकथा आणि संवाद यशवंत रांजणकर यांचे असून अशोक पत्की हे संगीतकार आहेत. शांताराम नांदगांवकर, वंदना विटणकर यांनी गीतलेखन केले आहे. रमेश देव-सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव याचा हा पहिला चित्रपट आहे.

कलाकार

आशा काळे, रवींद्र महाजनी, कुलदीप पवार, अर्चना जोगळेकर, निवेदिता जोशी, विजय गोखले, अजिंक्य देव, भारती आचरेकर, दीपज्योती नाईक, रवि पटवर्धन, जयराम कुलकर्णी, राजा मयेकर व बी. माजनाळकर.

गीते

  1. गांवे पूनवराती घडल्या ऽऽ भेटी ऽऽ
  2. चुनरी नको ओढू कशी सावरू मी
  3. प्राणसखी चंद्रमुखी तू प्रीत राणी गं
  4. चालू नको झोकात चंपा चमेली अंग अंग नाचे नशा धुंद आली
  5. बाळा तुझ्यासाठी ममता भुकी माऊलीची

अर्धांगी (१९४०)

अर्धांगी या नावाचा एक बेहतरीन चिरतरुण चित्रपट १९४० साली निघाला होता.[] कथा, पटकथा आणि संवाद प्र. के अत्रे यांचे होते तर मास्टर विनायक चित्रपटाचे दिग्दर्शक व नायक होते. छायाचित्रण पांडुरंग नाईक यांचे होते आणि दादा चांदेकर हे संगीत दिग्दर्शक होते.

कथासूत्र

आपली पत्नी आधुनिक असावी, दिसावी असा चित्रपट कथा नायक सत्यवानाचा प्रयत्न असतो. तिला इंग्रजी शिकवायचा त्याचा प्रयत्न करतो पण तो अयशस्वी होतो. मग सुखासाठी तो एका तत्त्ववेत्त्याच्या पत्नीच्या - अरुंधतीच्या - मोहात पडतो. पण हे प्रेम व त्याचा दिखावा बेगडी आहे, हे उमजून येताच तो घरी परतून येतो. या चित्रपटाच्या मराठी आवृत्तीबरोबरच ‘‘घर की रानी” ही हिंदी आवृत्तीही प्रदर्शित झाली होती.[]

अर्धांगी या बोलपटात आचार्य अत्र्यांनी एक नितांतरम्य कल्पना चित्रित केली आहे. स्त्रीसौंदर्याची तुलना चंद्राशी करताना अत्रे म्हणतात, "परमेश्वराने जग निर्माण केलें, फुलें निर्माण केलीं, चांदण्या केल्या, चंद्र केला आणि त्याच हातानें स्त्रीला निर्माण केली. तेव्हां देवादिकांत मोठा वाद निर्माण झाला. स्त्री सुंदर की चंद्र सुंदर? हा वाद मिटवण्यासाठी परमेश्वरानें एक मोठा सोन्याचा तराजू आणला. एका पारड्यात घातलें स्त्रीला, आणि दुसऱ्या पारड्यात चंद्राला, अन् तराजू वर उचलला तो काय? चंद्राचें पारडें वर गेलें. तो गेला आभाळात आणि स्त्री राहिली पृथ्वीतलावर!"

कलावंत

मास्टर विनायक, मीनाक्षी, लीला चिटणीस, दादा साळवी, दामुअण्णा मालवणकर, कुसुम देशपांडे, विमला वशिष्ट, बाबूराव पेंढारकर

छायाचित्रण पांडुरंग नाईक यांचे होते तर दादा चांदेकर हे संगीत दिग्दर्शक होते.

संदर्भ

  1. ^ "अर्धांगी". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2020-06-20 रोजी पाहिले.
  2. ^ a b "दुवा ज्जोडला". मेटा डेटा डॉट कॉम. २० जून २०२०.