Jump to content

अर्देशर तिसरा, पर्शिया

अर्देशर तिसरा (फारसी: اردشیر سوم;इ.स. ६२१ - २७ एप्रिल, इ.स. ६२९) हा सातव्या शतकातील पर्शियाचा सासानी राजा होता.

हा कवध दुसरा आणि त्याच्या एका रोमन राणीचा मुलगा होता. ६२८मध्ये पर्शियामध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीत तेथील अर्धेअधिक लोक मृत्यू पावले. त्यांत कवधचाही समावेश होता. त्यावेळी पर्शियाच्या वुझुर्गानने ७ वर्षांचा अर्देशरची राजेपदी निवड केली व वजीर महादुर गुशनास्पला त्याचा रक्षक म्हणून नेमला. सात महिन्यांच्या आत शहरबराझ या सरदाराने सत्ता हस्तगत करून महादुर गुशनास्प आणि अर्देशरचा वध केला.