Jump to content

अर्दाबिल प्रांत

अर्दाबिल
استان اردبیل
इराणचा प्रांत

अर्दाबिलचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
अर्दाबिलचे इराण देशामधील स्थान
देशइराण ध्वज इराण
राजधानीअर्दाबिल
क्षेत्रफळ१७,८०० चौ. किमी (६,९०० चौ. मैल)
लोकसंख्या१२,४८,४८८
घनता७० /चौ. किमी (१८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IR-24

अर्दाबिल (फारसी: استان اردبیل , ओस्तान-ए-अर्दाबिल ; अझरबैजानी: اردبیل اوستانی ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत इराणच्या वायव्य भागात असून याच्या सीमा पूर्वेस गिलान, दक्षिणेस जंजान, पश्चिमेस पूर्व अझरबैजान प्रांतांस भिडल्या आहेत. अर्दाबिलाच्या उत्तरेकडे अझरबैजान प्रजासत्ताक वसले आहे.

इ.स. १९९३ साली पूर्व अझरबैजान प्रांताचा पूर्वेकडील प्रदेश आणि गिलान प्रांताचा उत्तरेकडील प्रदेश एकत्र करून अर्दाबिलाची निर्मिती करण्यात आली. अर्दाबिल शहर हे या प्रांताचे राजधानीचे शहर आहे.