Jump to content

अर्थे खुर्द

[]

अर्थे हे एक महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील शहर आहे.

अर्थे हे शिरपूर तालुक्यातील महत्त्वाचे शहर आहे.

[]

इतिहास

अर्थे हे अहिर काळात महत्त्वाचं केंद्र होते. अहिर काळात अर्थ्याचे नाव अर्थनगर होते , महत्त्वपूर्ण बाजार पेठ असल्या मुळे या गावास आर्थनगर हे नाव मिळाले, फारुकी काळात हे गाव , परगणा होते , मलिक फरुकीचा मुलगा नासीर येथे सुभेदार होता. नंतर हे गाव कुर्मी पाटील व्यापाऱ्यांना सुभा म्हणून दिले. पूर्वी अर्थे हे थाळनेर सुभ्यात होते.

नंतर मुघल काळात परगना बदलून शिरपूर करण्यात आला व नंतर तो थाळनेर झाला. मराठा काळात अर्थेचे महत्त्व अधिक वाढले येथूनच सुरत- धरणगाव व्यापाराचा मार्ग गेल्या मुळे अर्थे पुन्हा संपन्न झाले.

१८१८ सालि ब्रिटिश सरकारने खानदेश जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात ३ कसबे पाडले त्यात थाळनेर, बोराडी व अर्थे ही स्थानके होती. अर्थे १९०६ साली पश्चीम खानदेश जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले. १९९० मध्ये अर्थे खुर्द व बुद्रुक या दोन ग्रामपंचायती स्वतंत्र झाल्या.

लोकसंख्या

अर्थे हे शहर बहुतांश हिंदूबहुल आहे. गावात 98% लोकसंख्या हिंदू आहे तर उर्वरीत 2% लोकसंख्या मुस्लिम बौद्ध व जैन आहे. अर्थे शहराची लोकसंख्या 18,000

एवढी आहे.

प्रशासन

अर्थे शहरात 2 ग्राम पंचायत आहेत, बुद्रुक व ग्रेटर खुर्द ग्रामपंचायत. गावात 16 वार्ड आहेत. गावात तलाठी कार्यालय, गट संघकार्यालय, पश्चिम शिरपूर उपतालुका मुख्यालय आहे. शहरात कृषी विभाग केंद्र आहे.

सुविधा

शहरात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. शहरात बँक शाखा, पोस्ट ऑफीस आहे. अर्थे शहरात 4 जि. प. शाळा आहेत. शिवाय अनेक महाविद्यालय आहेत. बसस्टंड आहे, गावात बाजार उपसमिती आहे.

रस्ते

अर्थे शहरातून बुऱ्हाणपूर- अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग जातो, शिवाय अर्थे- गिधाडे, अर्थे - बोराडी हा जिल्हा महामार्ग जातो, अर्थे शिरपूर पासून 10 किमी अंतरावर आहे.

भाग

गावात साई नगर, मुस्लिम वस्ती, आंबेडकरनगर , शिवजीनगर, झेंडा चौक आहे. गावात म्हाळसा, महादेव, हनुमान

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; :0 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ मुख्यालय, ग्रामपंचायत खुर्द व बुद्रुक. [अर्थे "अर्थे"] Check |url= value (सहाय्य).