Jump to content

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ - ६३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अर्जुनी मोरगाव मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. सडक-अर्जुनी तालुका, २. अर्जुनी मोरगांव तालुका आणि ३. गोरेगांव तालुक्यातील मोहाडी महसूल मंडळ यांचा समावेश होतो. अर्जुनी मोरगाव हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे हे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४राजकुमार सुदामजी बडोले भारतीय जनता पक्ष
२००९राजकुमार सुदामजी बडोले भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".