Jump to content

अरुणा ढेरे

डॉ. अरुणा ढेरे
अरुणा ढेरे
जन्म २ फेब्रुवारी १९५७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा
वडील डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे
पुरस्कार 'अनंत लाभसेटवार' पुरस्कार
अरुणा ढेरे

डॉ. अरुणा ढेरे ( - इ. स. १९५७) या मराठी भाषेतील लेखिका, कवयित्री आहेत.[]

बालपण

अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या होत.[] बालपणापासून साहित्याचे आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे.[][] लहानपणापासूनच वडिलांचा व्यासंगी श्वास लाभल्याने त्यांनी समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी साहित्याशी निगडित शास्त्रांचा आवश्यक तो अभ्यास केला, तसेच वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, जैन, बौद्ध, ख्रिस्ती धर्मग्रंथ यांच्याशीही ओळख करून घेतली. दंतकथा, मिथके यांचेही महत्त्व अभ्यासले.

शैक्षणिक अर्हता

  • शालेय शिक्षण- नूतन मराठी विद्यालय, हुजूरपागा मुलींची शाळा पुणे.
  • महाविद्यालीय शिक्षण- गरवारे महाविद्यालय आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे.
  • १९७७ साली पुणे विद्यापीठात बी.ए. च्या परीक्षेत सर्वप्रथम. सुवर्णपदक आणि अकरा अन्य पारितोषिके प्राप्त.
  • १९७९ साली पुणे विद्यापीठात एम.ए. च्या परीक्षेत सर्वप्रथम. सुवर्णपदक आणि तेरा अन्य पारितोषिके प्राप्त.
  • १९७७ साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठात भारतीय विद्या पदविकेत सर्वप्रथम. यशवंतराव चव्हाण पारितोषिक प्राप्त.
  • १९८६ साली पुणे विद्यापीठात, डॉ.भालचंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कथा-कादंबऱ्यांचा आदिबंधात्मक अभ्यास’ (जी.ए.कुलकर्णी आणि चिं.त्र्यं.खानोलकर यांच्या विशेष संदर्भात) या विषयावर प्रबंधलेखन. विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी प्राप्त.
  • १९८६ साली अमेरिकेत तीन महिन्यांचा कम्युनिकेशन स्टडीजचा अभ्यासक्रम पूर्ण.[]

कार्याचे स्वरूप

१९८३ ते १९८८ या काळात, पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रात अध्यापक-निर्माती म्हणून डॉ. अरुणा ढेरे यांनी काम केले आहे. १९८९ ते १९९१ याकाळात राज्य शिक्षणशास्त्र संस्थेत साहित्य-विभागप्रमुख म्हणून कार्यरत आणि ‘पसाय’ या मासिकाची संपादिका म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्या पूर्णवेळ लेखन आणि संशोधनकार्य करीत आहेत.

कारकीर्द

कवयित्री [] कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्यविषयक, सामाजिक इतिहासपर, किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले आहेत. संपादनेही केलेली सुनीता देशपांडे यांच्या निकटच्या सहवासातून अरुणा ढेरे यांची वैचारिक आणि साहित्यिक बैठक अधिक समृद्ध झाली आहे असे म्हणता येऊ शकेल. सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. या शिवाय स्फुट लेखसंग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा विस्मृतिचित्रे हा ग्रंथ अतिशय गाजला.स्वातंत्र्यपूर्व काळातील विशेष कारकीर्द घडविलेल्या महिलांवर त्यांनी विशेष लेखन केलेले आहे.मराठी साप्ताहिके,मासिके,वृत्तपत्रे यांचे त्यानी संपादन केलेले आहे.

अन्य

महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती आणि साहित्यविषयक समित्यांमध्ये ढेरे यांनी सदस्या म्हणून सहभाग नोंदविलेला आहे. लोकसाहित्य समिती,साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था अशा ठिकाणी समिती सदस्यत्वाचे म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मराठी भाषा आणि या भाषेतील उत्तम साहित्य समाजापुढे येण्यासाठी ढेरे या कार्यरत असतात.[]

प्रकाशित साहित्य

समीक्षात्मक लेखन

  1. काळोख आणि पाणी (१९९१)
  2. काळोखाचे कवडसे (१९८७)

वैचारिक पुस्तके

  1. अंधारातील दिवे
  2. अर्ध्या वाटेवर
  3. उंच वाढलेल्या गवताखाली
  4. उमदा लेखक -उमदा माणूस[](संपादित; वि.स. वाळिंबे यांच्यावरील लेखांचा संग्रह)
  5. उर्वशी
  6. कवितेच्या वाटेवर
  7. कवितेच्या शोधात
  8. जाणिवा जाग्या होताना
  9. जावे जन्माकडे (१९९८)
  10. त्यांची झेप त्यांचे अवकाश[]
  11. पावसानंतरचं ऊन
  12. प्रकाशाचे गाणे
  13. प्रतिष्ठेचा प्रश्न
  14. प्रेमातून प्रेमाकडे
  15. भगव्या वाटा
  16. मराठी प्रेमकविता (शांता शेळके यांच्या सहयोगाने)
  17. महाद्वार
  18. मैत्रेयी
  19. कल्हण पंडित यांची राजतरंगिणी - काश्मिरी राजांची गाथा (अनुवादित, सहअनुवादक - प्रशांत तळणीकर)
  20. रूपोत्सव
  21. लावण्ययात्रा
  22. लोक आणि अभिजात
  23. लोकसंस्कृतीची रंगरूपे
  24. विवेक आणि विद्रोह
  25. डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार’[१०]
  26. विस्मृतिचित्रे (१९९८)
  27. शाश्वताची शिदोरी
  28. शोध मराठीपणाचा' (सुभाष केळकर यांच्याबरोबर सहलेखन-मुख्य लेखक - दिनकर गांगल)
  29. स्त्री आणि संस्कृती

कविता संग्रह

[११]

  • ऊन उतरणीवरून - अरुणा ढेरे यांच्या निवडक कवितांचा संग्रह, प्रकाशक - सुरेश एजन्सी)
  1. जावे जन्माकडे
  2. निरंजन (१९९४)
  3. प्रारंभ (१९८६)
  4. मंत्राक्षर (१९९०)
  5. यक्षरात्र (१९८७)
  6. निळ्या पारदर्शक अंधारात (२००४)
  7. बंद अधरो से (हिंदी)[१२]
  8. साक्षीभावाने बघताना ('पोएट टु पोएट' या अभिनव संकल्पनेअंतर्गत जर्मन कवयित्री उलरिकं ट्रेस्नर हिच्या निवडक कवितांचे मराठी अनुसर्जन; सहलेखिका : जयश्री हरि जोशी)
  9. सृजन @ broad (१५ देशांतील ५५ कवितांचा संग्रह. संकल्पना - डाॅ. भूषण केळकर; संपादन - डाॅ. अरुणा ढेरे, संदीप खरे). यांतील काही कविता सी.डी.वर आहेत. पुस्तकाबरोबर सी.डी.ही मिळते.

कथासंग्रह

  1. अज्ञात झऱ्यावर रात्री (१९९५)
  2. काळोख आणि पाणी (१९९१)
  3. कृष्णकिनारा (१९९२)[१३]
  4. नागमंडल (संपादन, १९८७)
  5. प्रेमातून प्रेमाकडे
  6. भगव्या वाटा (१९९१)
  7. मन केले ग्वाही
  8. मनातलं आभाळ
  9. मैत्रेय
  10. रूपोत्सव (१९८७)
  11. लावण्ययात्रा (१९८७)
  12. वेगळी माती वेगळा वास (२००२)

बालवाङ्मय

  1. ताडोबाच्या जंगलात (बालकविता)
  2. मामाचं घर (बालकविता)
  3. सुंदर जग हे (बालकविता)
  4. हे माझे घर (बालकविता)

संपादन

  • स्त्री-लिखित मराठी कविता
  • स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०) (११ लेखिकांच्या कादंबऱ्यांचा परामर्श) (पद्मगंधा प्रकाशन)
  • इंदिरा (इंदिरा संतांच्या कवितांचा संग्रह), (प्रकाशन दिनांक २७-४-२०१४) या पुस्तकाला डॉ. अरुणा ढेरे यांची प्रस्तावना लाभली आहे.

अरुणा ढेरे यांच्यासंबंधी पुस्तके

  • अरुणोदय (डाॅ. स्वाती शिंदे-पवार) : अरुणा ढेरे यांच्या साहित्याचा मागोवा घेणारा ग्रंथ - संस्कृती प्रकाशन.

पुरस्कार, सन्मान आणि पदे

  • २०१९ साली यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.[१४]
  • नागपूरच्या डॉ. अनंत व लता लाभसेटवार न्यासाच्या वतीने अमेरिकेतल्या डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान
  • सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
  • लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार[]
  • पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठानचा साहित्यदीप पुरस्कार (६ मे २०१६)
  • मसाप चा २०१७ सालचा ग्रंथ पुरस्कार - ‘स्त्री-लिखित मराठी कविता’ या पुस्तकाला
  • मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार (१८-९-२०१७)[१५]
  • महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी विषयावरील उपयुक्त ग्रंथांची निवड करणाऱ्या ग्रंथ निवड समितीचे अध्यक्षपद (इ.स.२०१७पासून)
  • महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे-सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाऊंडेशन, सोलापूर यांच्यातर्फे दत्ता हसलगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार. (२८ जुलै २०१९)[१६]

संदर्भ

  1. ^ Datta, Amaresh (1988). Encyclopaedia of Indian Literature: Devraj to Jyoti (इंग्रजी भाषेत). Sahitya Akademi. ISBN 9788126011940.
  2. ^ "Chronicler of religious tradition, R.C. Dhere, passes away Shoumojit Banerjee (२. ७. २०१६)". line feed character in |title= at position 59 (सहाय्य)
  3. ^ a b "अरुणा ढेरे (१८. ११. २०१७)". 2018-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ "नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांच्या भिंतींचे घर आमुचे..! (२४. २. २०१७ )".
  5. ^ डॉ. भेंडे, सुभाष (२००९). आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश खंड दोन (साहित्य). साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्था).
  6. ^ मिश्रा गरिमा. [htt ps://indianexpress.com/article/cities/pune/city-poetess-lone-participant-from-pune-at-poets-translating-poets-festival-3050249/ "City poetess lone participant from Pune at Poets Translating Poets festival (२६. ९. २०१६) इंग्रजी मजकूर"] Check |url= value (सहाय्य). line feed character in |title= at position 90 (सहाय्य); line feed character in |url= at position 4 (सहाय्य)
  7. ^ "http://www.lokmat.com/pune/selected-akshardhan-meet-readers-quickly/ ( २८. ५. २०१८ )". External link in |title= (सहाय्य)
  8. ^ Vārshikī (हिंदी भाषेत). Kendrīya Hindī Nideśālaya, Śikshā tathā Saṃskr̥ti Mantrālaya, Bhārata Sarakāra. 2002.
  9. ^ ढेरे, अरुणा (2011). त्याञ्ची झेप त्याञ्चे अवकाश. Padmagandhā Prakāśana. ISBN 9788186177655.
  10. ^ Ḍhere, Aruṇā (2002). Sārvajanika satyadharmāce upāsaka Ḍô. Viśrāma Rāmajī Ghole āṇi tyāñcā parivāra. Rājahãsa Prakāśana.
  11. ^ "'क'तून उलगडला अरुणा ढेरे यांचा काव्यप्रवास (२६. ६. २०१८)".[permanent dead link]
  12. ^ Dhere, Dr Aruna (2010-09). Band Adhron Se (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 9789350002216. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  13. ^ Dhere, Aruna (2000). Krishna-kinara (हिंदी भाषेत). Bhavna. ISBN 9788176670333.
  14. ^ "साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे". २८.१०.२०१८. 2018-11-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  15. ^ "महाभारत ही अक्षय कथा (२०. ९. २०१७)".[permanent dead link]
  16. ^ "डॉ. अरुणा ढेरे यांनादत्ता हलसगीकर पुरस्कार प्रदान". महाराष्ट्र टाइम्स. २९. ७. २०१९. 2019-07-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)