Jump to content

अरुण सरनाईक

अरुण सरनाईक
जन्मअरुण सरनाईक
८ ऑगस्ट १९३२
मृत्यू १४ मार्च १९९८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख चित्रपट केला इशारा जाता जाता, सिंहासन'
वडील शंकरराव

अरुण शंकरराव सरनाईक (जन्म : ऑक्टोबर ४, १९३५; - मार्च १४, इ.स. १९९८) [] - हा मराठी चित्रपट-अभिनेता होता. त्याने मराठी चित्रपटांतूब व नाटकांतून अभिनय केला. इ.स. १९६१ सालच्या शाहीर परशुराम या चित्रपटातील पूरक भूमिकेद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले.

हिंदुस्तानी संगीतातील ख्यातनाम गायक निवृत्तीबुवा सरनाईक त्याचे काका होते.

संदर्भ

  1. ^ "रुबाबदार अदाकारीचा अरुणोदय..." १६ जुलै इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अरुण सरनाईक चे पान (इंग्लिश मजकूर)