Jump to content

अरुण शौरी

अरुण शौरी

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१०
मतदारसंघ उत्तर प्रदेश (राज्यसभा)

जन्म नोव्हेंबर २, इ.स. १९४१
जालंधर, भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी अनिता शौरी
व्यवसाय पत्रकार, लेखक
धर्म अनभिज्ञ[]

अरुण शौरी (नोव्हेंबर २, इ.स. १९४१:जालंधर - हयात) हे एक पत्रकार, लेखक, आणि राजकरणी आहेत. त्यांनी विश्व बँकेत १९६८-७२ आणि १९७५-७७ या काळात अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केले. ते भारताच्या योजना आयोगाचे सल्लागार होते; इंडियन एक्स्प्रेस आणि टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वर्तमानपत्रांचे संपादकही होते. १९९८-२००४ काळात भारत सरकारमध्ये मंत्री होते.[] १९८२ मध्ये त्यांना मॅगसेसे पुरस्कार मिळाला[] आणि १९९० मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला.[]

सुरुवातीचे जीवन

अरुण शौरी हे नोव्हेंबर २, १९४१ ला जालंधर येथे जन्मले. ते हरी देव शौरी आणि दयवंती देवाशर यांचे पहिले अपत्य होते. त्यांचे शिक्षण मॉडर्न स्कूल, बाराखंबा आणि सेंट स्टीफन्स, दिल्ली येथे झाले. नंतर संयुक्त संस्थानातील सायराक्यूज विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पीएचडी पदवी मिळवली.

कारकीर्द

इंडियन एक्स्प्रेसमध्ये कार्यकारी संपादक असताना जानेवारी १९७९ मध्ये त्यांनी सरकारातील उच्चपदस्थ लोकांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे उघडकीस आणले.[] १९८१ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या अब्दुल रहमान अंतुले यांच्याविरुद्ध एकट्याने आंदोलन सुरू केले, अंतुल्यांनी राज्याच्या संसाधनांवर आधारित उद्योगांकडून लाखो रुपयांची खंडणी गोळा करून ती इंदिरा गांधींच्या नावाखाली असलेल्या न्यासात(ट्रस्ट) भरली असा आरोप केला. या प्रकरणामुळे शेवटी अंतुल्यांना राजीनामा द्यावा लागला आणि गांधींना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला नाचक्की सहन करावी लागली.[]

शौरींनी काढलेल्या या प्रकरणांमुळे इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई कार्यालयात कामगार आंदोलने सुरू झाली. तेथील अंतुले यांच्याशी संबंध असलेल्या कामगार नेत्यांनी भारतातील बाकीच्या वर्तमानपत्रांपेक्षा दुप्पट पगार मिळावा म्हणून बंद करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सरकारनेही इंडियन एक्स्प्रेसविरुद्ध अनेक खटले भरले. १९८२ मध्ये मालक रामनाथ गोएंका यांनी सरकारच्या सततच्या दबावामुळे शौरी यांना कामावरून काढून टाकले.[]

संदर्भ

  1. ^ "God's an invention to suit society's needs: Arun Shourie". 2011-07-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-25 रोजी पाहिले.
  2. ^ अरुण शौरी दूरसंचार मंत्री असतानाची बातमी
  3. ^ "मॅगसेसे पुरस्काराच्या संकेतस्थळावरील अरूण शौरींची माहिती". 2010-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-25 रोजी पाहिले.
  4. ^ भारत सरकारच्या संकेतस्थळावरील पद्मभूषणविजेत्यांची यादी[मृत दुवा]
  5. ^ "अरुण शौरी" (इंग्रजी भाषेत). 2007-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-11-24 रोजी पाहिले.
  6. ^ "India's Watergate : a study of political corruption in India / G. S. Bhargava National Library of Australia" (इंग्रजी भाषेत).
  7. ^ "The Arun Shourie Site" (इंग्रजी भाषेत). 2015-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-11-24 रोजी पाहिले.

बाह्यदुवे