अरुण बालकृष्ण कोलटकर
अरुण कोलटकर | |
---|---|
जन्म नाव | अरुण बालकृष्ण कोलटकर |
जन्म | १ नोव्हेंबर, इ. स. १९३२ कोल्हापूर |
मृत्यू | २५ सप्टेंबर, इ. स. २००४ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी, इंग्रजी |
साहित्य प्रकार | कविता |
चळवळ | भारतीय आधुनिकोत्तरतावाद |
प्रसिद्ध साहित्यकृती | "जेजुरी" |
प्रभाव | विल्यम कार्लोस विल्यम्स |
अरुण बालकृष्ण कोलटकर (नोव्हेंबर १, १९३२ - सप्टेंबर २५, २००४) हे मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी होते.
परिचय
कोलटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. १९५०–१९६० च्या दशकांत त्यानी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते. उदाहरणार्थ, मै भाभीको बोला / क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ? / भड़क गयी साली / रहमान बोला गोली चलाऊॅंगा / मै बोला एक रंडीके वास्ते? / चलाव गोली गांडू.[१]
प्रकाशित काव्यसंग्रह
मराठी
- अरुण कोलटकरच्या कविता (१९७७)
- चिरीमिरी (२००४)
- द्रोण (२००४)
- भिजकी वही (२००४)
- अरुण कोलट्करच्या चार कविता
इंग्रजी
- कलेक्टेड पोएम्स इ्न इंग्लिश
- जेजुरी
- काळा घोडा पोएम्स
- द बोटराईड ॲन्ड अदर पोएम्स
- सर्पसत्र
पुरस्कार
- २००५ चा साहित्य अकादमी पुरस्कार
- कुसुमाग्रज पुरस्कार
- २००५ चा बहिणाबाई पुरस्कार
- १९७६ चा राष्ट्रकुल काव्य पुरस्कार
इतर
- अरुण कोलटकर हे ’शब्द’ या लघु नियतकालिकाचे रमेश समर्थ व दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्याबरोबर सहसंपादक होते.
बाह्य दुवे
- कवितांच्या लाटांवर कोलटकरांची 'बोटराइड'[permanent dead link]
- ^ अरुण कोलटकर : पहिल्या कविता, लेख, समीक्षेचा अंतःस्वर. देवानंद सोनटक्के पद्मगंधा प्रकाशन पुणे, २०१२