अरुण फडके
अरुण फडके (१९६० - १४ मे, २०२०[१]):नाशिक, महाराष्ट्र, भारत) हे मराठी लेखक होते.
हे मराठी शुद्धलेखन विषयावर पुस्तके लिहिणारे, त्यासाठी व मराठी शिबिरे घेणारे एक तज्ज्ञ होते. त्यांच्या शिबिरात मराठी शुद्धलेखनाचे नियम, वाक्यरचना आणि लिखित मराठी मजकुराचे संपादन हे विषय शिकवले जात. त्यांची शुद्धलेखन ठेवा खिशात ही छोटी पुस्तिका प्रमाण मराठी शुद्धलेखनाचा संदर्भ होता.
शुद्धलेखन हा आग्रह न होता सवय झाली पाहिजे हे फडक्यांचे मानणे होते.
भाषा या विषयात गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखननियम या चारही विभागांना समान गुणसंख्या असेल तर शुद्धलेखनाचे अध्ययन गांभीर्याने होईल, असे अरुण फडके यांचे मत होते. लेखन नियम आणि व्याकरण यांकडे दुर्लक्ष झाले तर ती भाषा संकटात येऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. लेखनाच्या नियमांमध्ये एकवाक्यता असणारी भाषाच वेगात प्रगती करू शकते, असा त्यांचा विश्वास होता.
२०२०मध्ये कर्करोगाने नाशिक येथे त्यांचे निधन झाले. शेवटची चार वर्षे ते नाशिकला आणि त्याआधी ते ठाण्याला असत.
पुस्तके
- मराठी लेखन कोश
- मराठी शुद्धलेखन प्रदीप, (सहलेखक - मो.रा. वाळंबे)
- शुद्धलेखन ठेवा खिशात
संदर्भ आणि नोंदी
- ^ author/online-lokmat (2020-05-14). "मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन". Lokmat. 2020-05-14 रोजी पाहिले.