Jump to content

अरुण पुराणिक

अरुण पुराणिक हे जुन्या मुंबईवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत.

'रिलायन्‍स' कंपनीतून उपाध्‍यक्ष पदावरून निवृत्त झाल्यावर अरुण पुराणिक हे 'टाटा पॉवर'मध्‍ये सल्‍लागार म्‍हणून काम करू लागले. १९८६ सालापासून ते वर्तमानपत्रे-साप्‍ताहिके यांमधून सातत्‍याने लेखन करत आले आहेत. चित्रपट, संगीत, मुंबईतील जुनी स्‍थळे, अशा विविध विषयांचा शोध घेऊन ते त्यांवर लिहितात. त्‍यांचे दीड हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी 'सिनेमाची शंभर वर्षे', 'सिनेमा आणि मुंबई शहर' अशा विषयांवरील फोटो, पोस्‍टर्स, लॉबी कार्ड, पुस्‍तिका यांची प्रदर्शने भरवली आहेत.

प्रसिद्ध लेख

  • कामाठीपुऱ्यातील अलेक्झांड्रा [१] Archived 2021-01-19 at the Wayback Machine.
  • चोर बाजार - मुंबापुरीची खासियत
  • नलिनी तर्खड - मूकपटाच्या काळातील नायिका : यशापयशाची सापशिडी
  • पंढरीचे बदलते स्वरूप
  • बहुगुणी सिनेमावाले नानासाहेब सरपोतदार
  • व्हिक्टोरिया - मुंबईची शान

पुस्तके

  • अनसंग हीरोज
  • मुंबई टॉकीज
  • सरगम
  • हमारी याद आयेगी (सिनेकलावंतांची शब्दचित्रणे)
  • हरवलेली मुंबई