Jump to content

अरुण जेटली स्टेडियम

फिरोजशाह कोटला मैदान
मैदान माहिती
स्थान बहादूर शहा झाफर मार्ग, दिल्ली
गुणक28°38′16″N 77°14′35″E / 28.63778°N 77.24306°E / 28.63778; 77.24306गुणक: 28°38′16″N 77°14′35″E / 28.63778°N 77.24306°E / 28.63778; 77.24306
स्थापना १८८३[]
आसनक्षमता ४८,०००[]
मालक दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन
प्रचालक दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन
यजमान भारतीय क्रिकेट संघ
दिल्ली क्रिकेट संघ
दिल्ली डेरडेव्हिल्स

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा.१०-१४ नोव्हेंबर १९४८:
भारत  वि. वेस्ट इंडीज
अंतिम क.सा.३-७ डिसेंबर २०१५:
भारत  वि. दक्षिण आफ्रिका
प्रथम ए.सा.१५ सप्टेंबर १९८२:
भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा.२० ऑक्टोबर २०१६:
भारत वि. न्यू झीलंड
प्रथम २०-२०२३ मार्च २०१६:
अफगाणिस्तान वि. इंग्लंड
अंतिम २०-२०३० मार्च २०१६:
इंग्लंड वि. न्यू झीलंड
शेवटचा बदल १ जानेवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

भारतातील नवी दिल्लीच्या बहादूर शाह झाफर मार्ग येथे अरुण जेटली क्रिकेट मैदान (पुर्वीचे फिरोजशहा कोटला मैदान) वसलेले आहे.[] मैदानाची स्थापन १८८३ मध्ये झाली कोलकाता येथील इडन गार्डन्स नंतर, सध्या चालू स्थितीतील ते भारतातील दुसरे मैदान आहे. २०१६ पर्यंत, शेवटची कसोटी सामन्यांमध्ये २८ वर्षे आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १० वर्षे या मैदानावर भारतीय क्रिकेट संघ अजिंक्य राहिला आहे.[] अनिल कुंबळेचे पाकिस्तानविरुद्ध एका कसोटी डावातील १० बळी, सुनील गावसकरला मागे टाकून ३५ शतकांसह सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रम आणि त्या आधी डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी गावसकरने केलेली बरोबरी अशा उल्लेखनीय घटनांमुळे हे मैदान लक्षात राहते.

इतिहास

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान १० नोव्हेंबर १९४८ रोजी झालेला कसोटी सामना, हा ह्या मैदानावरचा पहिला कसोटी सामना होता. मैदानाचे मालकी आणि व्यवस्थापकिय हक्क डीडीसीए (दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन) कडे आहेत. १९५२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना हेमू अधिकारी आणि गुलाम अहमद यांनी दहाव्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारीचा ह्या मैदानातील विक्रम आजपर्यंत अबाधित आहे. १९६५ मध्ये, श्रीनिवास वेंकटराघवनने त्याच्या पदार्पणातील मालिकेमध्ये न्यू झीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडताना ७२ धावांत ८ आणि ८० धावांत ४ गडी बाद केले होते. १९६९-७० मध्ये, बिशनसिंग बेदी आणि एरापल्ली प्रसन्ना ह्या फिरकी जोडीने १८ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला ७ गड्यांनी सुप्रसिद्ध विजय विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.[] १९८१ मध्ये, जेफ्री बॉयकॉटने गॅरी सोबर्सचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला. १९८-८४ मध्ये सुनील गावसकरने त्याचे २९वे शतक ठोकून डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक काळासाठी अबाधित असलेला सर्वात जास्त कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. १९९९-२००० मध्ये, पाकिस्तान विरुद्ध कसोटीच्या चवथ्या डावात ७४ धावांत १० बळी घेऊन एका डावात १० बळी घेणारा अनिल कुंबळे हा जिम लेकर नंतर दुसरा गोलंदाज ठरला. २००५-०६ मध्ये ह्याच मैदानावर सचिन तेंडुलकरने गावस्करचा सर्वाधिक ३५ कसोटी शतकांचा विक्रम मोडला.[] २७ डिसेंबर २००९ रोजी, सामना खेळवण्यास खेळपट्टी योग्य नसल्या कारणाने भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा सामना रद्द करण्यात आला. सामनाधिकाऱ्याच्या सामना अहवालावरुन, आयसीसीने मैदानावर १२ महिन्यांचा निर्बंध लादला. त्यानंतर थेट २०११ क्रिकेट विश्वचषकासाठी मैदानाची निवड करण्यात आली.[] २००८ पासून सदर मैदान हे भारतीय प्रीमियर लीगचा संघ दिल्ली डेरडेव्हिल्सचे होम ग्राऊंड आहे.[]

आकडेवारी

फिरोज शाह कोटला – वेस्ट इंडीज वि दक्षिण आफ्रिका
फिरोज शाह कोटला मैदान

कसोटी क्रिकेट

  • सर्वाधिक सांघिक धावसंख्या: वेस्ट इंडीज ६४४/८घो वि भारत, ६ फेब्रुवारी १९५९[]
  • सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या: भारत ७५ वि वेस्ट इंडीज, २५ नोव्हेंबर १९८७[]
  • सर्वाधिक धावा: सचिन तेंडुलकर (७५९ धावा)
  • सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: बर्ट सुटक्लिफ २३०* वि भारत, १६ डिसेंबर १९५५
  • सर्वात यशस्वी गोलंदाज: अनिल कुंबळे (५८ बळी)

एकदिवसीय क्रिकेट

  • सर्वाधिक सांघिक धावसंख्या: वेस्ट इंडीज ३३०/८घो वि नेदरलँड्स, २८ फेब्रुवारी २०११[]
  • सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या: नेदरलँड्स ११५ वि वेस्ट इंडीज, २८ फेब्रुवारी २०११[]
  • सर्वाधिक धावा: सचिन तेंडुलकर (३०० धावा)
  • सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: रिकी पॉंटिंग १४५ वि झिम्बाब्वे, ११ एप्रिल १९९८
  • सर्वात यशस्वी गोलंदाज: केमार रॉच (वे), रवींद्र जडेजा (भा), हरभजनसिंग (भा), अजित आगरकर (भा) (७ बळी)

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

कसोटी

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
१०-१४ नोव्हेंबर १९४८भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
२-७ नोव्हेंबर १९५१भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णितधावफलक
१६-१८ ऑक्टोबर १९५२भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारतचा ध्वज भारत१ डाव आणि ७० धावाधावफलक
१६-२१ डिसेंबर १९५५भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडअनिर्णितधावफलक
६-११ फेब्रुवारी १९५९भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
१२-१६ डिसेंबर १९५९भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१ डाव आणि १२७ धावाधावफलक
८-१३ फेब्रुवारी १९६१भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णितधावफलक
१३-१८ डिसेंबर १९६१भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णितधावफलक
८-१३ फेब्रुवारी १९६४भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णितधावफलक
१९-२२ मार्च १९६५भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत७ गडीधावफलक
२८ नोव्हेंबर-२ डिसेंबर १९६९भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत७ गडीधावफलक
२०-२५ डिसेंबर १९७२भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड६ गडीधावफलक
११-१५ डिसेंबर १९७४भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१ डाव आणि १७ धावाधावफलक
१७-२२ डिसेंबर १९७६भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१ डाव आणि २५ धावाधावफलक
२४-२९ जानेवारी १९७९भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
१३-१८ ऑक्टोबर १९७९भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाअनिर्णितधावफलक
४-९ डिसेंबर १९७९भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णितधावफलक
२३-२८ डिसेंबर १९८१भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णितधावफलक
२९ ऑक्टोबर -३ नोव्हेंबर १९८३भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
१२-१७ डिसेंबर १९८४भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड८ गडीधावफलक
२६-३० सप्टेंबर १९८६भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाअनिर्णितधावफलक
२५-२९ नोव्हेंबर १९८७भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज५ गडीधावफलक
१३-१७ मार्च १९९३भारतचा ध्वज भारतझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेभारतचा ध्वज भारत१ डाव आणि १३ धावाधावफलक
१०-१३ ऑक्टोबर १९९६भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत७ गडीधावफलक
४-७ फेब्रुवारी १९९९भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारतचा ध्वज भारत२१२ धावाधावफलक
१८-२२ नोव्हेंबर २०००भारतचा ध्वज भारतझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेभारतचा ध्वज भारत७ गडीधावफलक
२८ फेब्रुवारी-४ मार्च २००२भारतचा ध्वज भारतझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेभारतचा ध्वज भारत४ गडीधावफलक
१०-१४ डिसेंबर २००५भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत१८८ धावाधावफलक
२२-२६ नोव्हेंबर २००७भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारतचा ध्वज भारत६ गडीधावफलक
२९ ऑक्टोबर-२ नोव्हेंबर २००८भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाअनिर्णितधावफलक
६-९ नोव्हेंबर २०११भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारतचा ध्वज भारत५ गडीधावफलक
२२-२४ मार्च २०१३भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत६ गडीधावफलक
३-७ डिसेंबर २०१५भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारतचा ध्वज भारत३३७ धावाधावफलक

एकदिवसीय

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
१५ सप्टेंबर १९८२भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत६ गडीधावफलक
०२ ऑक्टोबर १९८६भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत३ गडीधावफलक
१३ जानेवारी १९८७भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत६ गडीधावफलक
२२ ऑक्टोबर १९८७भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत५६ धावाधावफलक
१५ ऑक्टोबर १९८९इंग्लंडचा ध्वज इंग्लंडश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड५ गडीधावफलक
२३ ऑक्टोबर १९८९भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२० धावाधावफलक
०३ नोव्हेंबर १९९४भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत१०७ धावाधावफलक
०२ मार्च १९९६भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका६ गडीधावफलक
११ एप्रिल १९९८ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१६ धावाधावफलक
१४ एप्रिल १९९८भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया४ गडीधावफलक
१७ नोव्हेंबर १९९९भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत७ गडीधावफलक
३१ जानेवारी २००२भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड२ धावाधावफलक
१७ एप्रिल २००५भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१५९ धावाधावफलक
२८ मार्च २००६भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत३९ धावाधावफलक
०२ डिसेंबर २००८भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसामना रद्दधावफलक
३१ ऑक्टोबर २००९भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत६ गडीधावफलक
२७ डिसेंबर २००९भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाअनिर्णितधावफलक
२४ फेब्रुवारी २०११दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका७ गडीधावफलक
२८ फेब्रुवारी २०११Flag of the Netherlands नेदरलँड्सवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२१५ धावाधावफलक
०७ मार्च २०११कॅनडाचा ध्वज कॅनडाकेन्याचा ध्वज केन्याकॅनडाचा ध्वज कॅनडा५ गडीधावफलक
०९ मार्च २०११भारतचा ध्वज भारतFlag of the Netherlands नेदरलँड्सभारतचा ध्वज भारत५ गडीधावफलक
१७ ऑक्टोबर २०११भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत८ गडीधावफलक
०६ जानेवारी २०१३भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारतचा ध्वज भारत१० धावाधावफलक
११ ऑक्टोबर २०१४भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारतचा ध्वज भारत४८ धावाधावफलक
२० ऑक्टोबर २०१६भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड६ धावाधावफलक

टी२०

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[११]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
२३ मार्च २०१६Afghanistanइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१५ धावाधावफलक
२६ मार्च २०१६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१० धावाधावफलक
२८ मार्च २०१६दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका८ गडीधावफलक
३० मार्च २०१६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड७ गडीधावफलक

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ a b "फिरोजशाह कोटला, नवी दिल्ली". क्रिकविन्डो (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / कसोटी सामने". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ a b c फिरोजशाह कोटला क्रिकइन्फो.कॉम
  5. ^ २०१० च्या शेवटीपर्यंतर फिरोजशाह कोटलावर आंतरराष्ट्रीय सामने नाहीत
  6. ^ "वेस्ट इंडीजचा भारत दौरा, ५वी कसोटी: भारत वि वेस्ट इंडीज, दिल्ली, फेब्रुवारी ६-११, १९५९" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "वेस्ट इंडीजचा भारत दौरा, १ली कसोटी: भारत वि वेस्ट इंडीज, दिल्ली, २५-२९ नोव्हेंबर, १९८७" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ a b "आयसीसी क्रिकेट विश्वचषक, १३वा सामना, गट ब: नेदरलँड्स वि वेस्ट इंडीज, दिल्ली, २८ फेब्रुवारी २०११" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे