Jump to content

अरुण काळे

अरुण काळे
जन्म २५ एप्रिल १९५२
नाशिक
मृत्यू २० फेब्रुवारी, इ.स. २००८
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषामराठी
साहित्य प्रकार कविता
विषय फुले आंबेडकरी जाणीवा शहर जीवन
चळवळ दलित पँथर
प्रसिद्ध साहित्यकृती

रॉक गार्डन (इ.स. १९९३)
सायरनचे शहर (इ.स. १९९७)
नंतर आलेले लोक (इ.स. २००६)

ग्लोबल गावकुस (इ.स.२००८)
प्रभावित नामदेव ढसाळ
पुरस्कार महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार

अरुण काळे (जन्मदिनांक अज्ञात - २० फेब्रुवारी, इ.स. २००८[] ) हे मुक्त छंदात काव्य रचना करणारे मराठी कवी होते. []

जीवन

लेखन

नव्वदोत्तरी कवितेची चर्चा केली जात असताना अरुण काळेंची ‘नंतर आलेले लोक’ मधील कविता आली आणि त्याआधीच्या नव्वदोत्तरी कवितेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. अरुण काळे यांच्या कवितेने पहिल्यांदा जागतिकीकरणामुळे तळागाळातल्या माणसांच्या जगण्यावर केलेल्या परिणामांचा प्रभावीपणे वेध घेतला. []

प्रसिद्ध कविता

'तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा' कवितेचा अन्वयार्थ

कवीने बाबासाहेबांच्या असामान्यतेला संगणकीय प्रतिमांनी व्यक्त केले आहे. मदरबोर्ड संगणकाचा आधारस्तंभ असतो. तसे कवीसाठी बाबासाहेबाचे तत्त्वज्ञान आहे. हजारो वर्षांची पारंपरिक मेमरी बाबासाहेबांनी धर्मांतराच्या अपडेट प्रोग्रामने घालवली. संगणकाला अपडेट प्रोग्रॅम नसेल तर तो आउटडेटेड होतो, पण बाबासाहेबांच्या विचारांचे वैशिष्टय असे की, दलितांचे भविष्यातील सामाजिक सॉंफ्टवेअर खराब न होऊ देणारी ॲंन्टी-व्हायरस खबरदारी त्यांच्या विचारात आधीच आहे. त्यामुळे सामाजिक विषमतेचे नवे विषाणू ते मुळातून नष्ट करते, असे कवी म्हणतो. कवीने येथे नव्या दलितत्वाच्या विषाणूचे सूचन केले आहे; आणि त्याला तोंड देण्याची क्षमता बाबासाहेबांच्या विचारात आहे अन्य महापुरुषांच्या विचारात नाही, असे परखडपणे सांगितले आहे. विचारांची समकालीन उपयुक्तता नसलेल्या महापुरुषांना कवीने ‘एकमेकांच्या प्रकृतीच्या चवकश्या करणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातील सिनियर सिटीझन्सची’ उपमा दिली आहे; तर बाबासाहेबांचे द्रष्टेपण सांगण्यासाठी ‘पोरगं हरवू नये म्हणून पुढे जाऊन उभे राहणाऱ्या बापाची’ उपमा दिली आहे, जी अत्यंत मौलिक आणि नावीन्यपूर्ण आहे. आज बाबासाहेबांच्या तत्वज्ञानावर, विचारावर विद्यापीठात संशोधन होतेय, साहित्य संमेलनात चर्चा होतेय, नाटक –सिनेमे तयार होताहेत, शिवाय त्यांच्या विचारांची नव्याने अन्वयार्थ लावून नवी आंदोलने उभी राहताहेत – कवी यालाच ‘बारा हत्तीचं बळ’ म्हणतो.[]

हे सुद्धा पहा

संकीर्ण

  • अरुण काळे: व्यक्ती आणि वाङ्‌मय' हा ग्रंथ प्रा. मोतीराम कटारे आणि प्रा. गंगाधर आहिरे यांनी संपादित

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://epaper.esakal.com/esakal/20100220/5407963702051463107.htm [मृत दुवा]
  2. ^ "'नंतर आलेल्या लोकां'ची नोंद घ्यायलाच पाहिजे". १२ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ^ http://www.globalmarathi.com/20111121/4818910837080376362.htm
  4. ^ सर्वधारा, अमरावती, अंक,जुलै ते सप्टें. २०१२ ले.प्रा. देवानंद सोनटक्के

नवाक्षर दर्शन, अरुण काळे विशेषांक, संपा.प्रवीण बांदेकर,सावंतवाडी