अरापाहो बेसिन
अरापाहो बेसिन किंवा ए-बेसिन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिसॉर्ट आहे. हे स्की रिसॉर्ट उत्तर अमेरिकेतील सहसा दर वर्षी सगळ्यात शेवटी बंद होणारे स्की रिसॉर्ट असते. इतर स्की रिसॉर्ट मेच्या सुरुवातीस बंद होत असले तरी ए-बेसिन अनेकदा जुलैमध्ये बंद होते व नोव्हेंबरमध्ये परत सुरू होते.