Jump to content

अरविंद पिळगावकर

अरविंद पिळगावकर (जन्म : १८-१०-१९३७) हे मराठी नाट्य‍अभिनेते आहेत. मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून नाट्यशास्त्राचे धडे घेतले. १९६४ साली त्यांनी ’यशवंतराव होळकर’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. ते गायक नट आहेत. ’साहित्य संघ’ आणि ’विद्याधर गोखले प्रतिष्ठान’ या संस्थांत ते संगीत नाट्यप्रशिक्षक म्हणून ते काम करीत असतात.


अरविंद पिळगावकरांनी भूमिका केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)

  • अमृत मोहिनी (विष्णू)
  • इंद्रजित वध (परिपार्श्वक)
  • एकच प्याला (रामलाल)
  • संत कान्होपात्रा (चोखोबा आणि राजा)
  • कृष्णार्जुन युद्ध (कृष्ण)
  • घनश्याम नयनी आला (युवराज)
  • जय जगदीश हरे (जयदेव)
  • दशावतारे राजा (नारद)
  • धाडिला राम तिने का वनी? (भरत)
  • नयन तुझे जादुगार (प्रसाद)
  • पंढरपूर (लिंबाजी)
  • पुण्यप्रभाव (भूपाल)
  • प्रीतिसंगम (खलनायक)
  • बावनखणी ( सुखदेव/बाजीराव)
  • भाव तोचि देव (एकनाथ)
  • सं. भावबंधन (प्रभाकर)
  • महाश्वेता (पुंडलिक)
  • माझा होशिल का ()
  • माता न तू वैरिणी (कुणाल)
  • सं. मानापमान (धैर्यधर, लक्ष्मीधर)
  • सं. मृच्छकटिक (शर्विलक)
  • यशवंतराव होळकर (पठाण)
  • रीत अशी प्रीतीची (कृष्ण)
  • लाडकी लक्ष्मी (विष्णू)
  • वाऱ्यावरची वरात (देसाई)
  • सं. वासवदत्ता (उदयन)
  • विठो रखुमाय ( माळी राया/मांत्रिक)
  • सं. विद्याहरण (कच)
  • सं. शारदा (कोदंड)
  • शेपटीचा शाप (कवी)
  • शोभिली भगिनी कृष्णाला (कृष्ण)
  • संत कान्होपात्रा (चोखा मेळा आणि राजा)
  • संत नामदेव (नामदेव)
  • संगीत संशयकल्लोळ (अश्विनशेठ/साधू)
  • सोन्याची द्वारका (सुदाम)
  • सं. सौभद्र (अर्जुन, कृष्ण, नारद, सूत्रधार)
  • स्वयंवर (भीष्मक)
  • हाच मुलाचा बाप

आठवणीतील गाणी

  • उडुनी जा पाखरा (नाटक : नयन तुझे जादुगार)
  • कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला (नाटक : धाडला राम तिने का वनी)

अरविंद पिळगावकरांनी गायलेली नाट्यगीते इथे आहेत. रुपसुंदर सखी

पुरस्कार

अरविंद पिळगावकरांना महाराष्ट्र सरकारकडून अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित केले आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.