अरविंद पाटील निलंगेकर
अरविंद पाटील निलंगेकर | |
महाराष्ट्र प्रदेश सचिव | |
कार्यकाळ २०२१ – विद्यमान | |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
---|---|
राजकीय पक्ष | भारतीय जनता पार्टी |
आई | श्रीमती रुपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील |
वडील | दिलीपराव शिवाजीराव पाटील निलंगेकर (१९८५ - आमदार, निलंगा मतदारसंघ) |
पत्नी | सौ.समिधा अरविंद पाटील निलंगेकर |
निवास | निलंगा |
धर्म | हिंदू |
संकेतस्थळ | {{URL|example.com|optional display text}} |
अरविंद पाटील निलंगेकर (निलंगा, लातूर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक राजकारणी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत. पक्षाची संघटन बांधणी हा महत्वपूर्ण विषय त्यांच्याकडे आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब राजकीय क्षेत्रात असल्याने त्यांच्यावर बालपणापासूनच जनतेची सेवा करण्याची शिकवण आहे. याच शिकवणीनुसार ते जनतेच्या सेवेत अग्रेसर असतात. संघटन बांधणी हा त्यांचा हातखंडा होय. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात संघटन बांधणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. तरुण व उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
लोकनेतृत्व
अरविंद पाटील निलंगेकर हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी कार्यरत आहेत. राजकीय घरात जन्म झाल्याने अरविंद बालपणीपासूनच जनतेच्या सानिध्यात अधिक राहिले आहेत. त्यांचे मोठे बंधू आमदार श्री.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचार कार्यात तसेच विकासकामात ते मोठा सहभाग घेतात. संभाजी यांच्यासाठी पडद्यामागचा सच्चा कार्यकर्ता म्हणून अरविंद अहोरात्र मेहनत घेतात. प्रत्येक कार्य सचोटीने पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो.
त्यांच्या नेतृत्वात भाजपा प्रदेश सचिव म्हणून त्यांनी पक्ष संघटन बांधणीसाठी 'समर्थ बूथ अभियान' राबविले. सदर अभियान महाराष्ट्र भाजपासाठी येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरत आहे. राज्यातील प्रत्येक गावात आपला पदाधिकारी नेमणे व त्यांच्यापर्यंत पक्षाचा प्रत्येक संदेश पोहचून सदर कार्य पूर्ण करून घेणे यासाठी हे अभियान होते. गावागावात असलेले भाजपाचे पदाधिकारी हे समर्थ बूथ अभियानाचे सर्वात मोठे यश आहे.
सामाजिक कार्य
शिवजयंती
आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हा एक सण आहे. याप्रकारे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन त्यांनी केले. यात महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश होता. हा शिवजयंती सोहळा लातूरकरांच्या नजरेचे पारणे फेडणारा सोहळा असल्याचे लातूरकर सांगतात.
लसीकरण टास्क फोर्स
संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध लढाई लढतो आहे. या लढाईत कोरोना प्रतिबंधात्मक लस मोठी ढाल ठरते आहे. निलंगा तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी नानाविध प्रयत्न केले. याचेच फलित म्हणून निलंगा तालुक्याचे लसीकरण प्रमाण अद्वितीय आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम १ लाख नागरिकांचे लसीकरण या तालुक्यात झाले.
अक्का फाऊंडेशन
त्यांच्या मातोश्री श्रीमती रूपाताई पाटील यांच्या नावाने सुरू असलेल्या अक्का फाउंडेशन अंतर्गत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम संपन्न होतात. अनाथ बांधव, दिव्यांग बांधव, विधवा महिला, शेतकरी कुटुंब, कोरोना काळात अन्नदान, लसीकरण मोहीम असे विविध कार्य या मार्फत अरविंद पाटील निलंगेकर करत असतात.
अन्नत्याग आंदोलन
अतिवृष्टीच्या गर्तेत सापडलेल्या बळीराजाला न्याय देण्यासाठी त्यांचे मोठे बंधू आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी '७२ तास अन्नत्याग आंदोलन' हा लढा उभा केला. मात्र या आंदोलनाचे पडद्यामागचे संपूर्ण नियोजन हे अरविंद यांनी चोखपणे बजावले. तीन दिवस सुरू असलेल्या आंदोलनात लाखो शेतकरी बांधव जमले मात्र कुठेही गडबड, गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलनात सहभागी प्रत्येक बांधवांची योग्य काळजी घेण्यासाठी लागणारी प्रत्येक बाब त्याठिकाणी उपलब्ध होती. काही शेतकरी बांधवांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले त्याबाबतची संपूर्ण काळजी घेण्यात आली. आंदोलनाच्या यशस्वीततेमागे अरविंद यांचा देखील महत्वाचा वाटा आहे.
कोरोना काळात भरीव कार्य
कोरोना संकट काळात सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण असताना जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठीच्या योग्य साधनाबाबत अरविंद नेहमी त्यांच्या संपर्कात असत. पहिल्या लाटेत अन्नदान, मास्क वाटप, आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट इत्यादी आवश्यक सामान पोहचवणे. तर दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनचा तुटवडा लक्षात घेता ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध केले. यामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले. रुग्णास वेळेत उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढवली.
विकासकामात नावीन्य
तरुण नेतृत्व असल्याने अरविंद यांच्या मनात अनेक नाविन्यपूर्ण कल्पना असतात. याच कल्पनांच्या आधारे निलंगा येथे स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने 'अटल वॉल्कवे' ची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून नागरिकांना फिरण्यासाठी जागा, एलइडी शो, आकर्षक रोषणाई असलेल्या जागेची निर्मिती झाली.
शैक्षणिक पार्श्वभूमी
पारिवारिक पार्श्वभूमी
वडिल : दिलीपराव शिवाजीराव पाटील निलंगेकर (१८८५ - आमदार, निलंगा मतदारसंघ)
आई :(जन्म १ जून १९५७) श्रीमती रूपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील अरविंद यांचे राजकीय श्रद्धास्थान; ह्या त्यांच्या आई आहेत. २००४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत लातूर मतदारसंघातून, मा.रूपाताई पाटील निलंगेकर खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. वृक्ष लागवड - हिरव्यागार आणि समृद्ध लातूरसाठी त्यांच्या मातोश्री आपल्या कार्यकाळातील सर्व पगारातुन एकही रुपया स्वतःसाठी खर्च न करता वृक्षलागवडीचे मोठे काम करीत तसेच आजही मिळणाऱ्या पेन्शनच्या सर्व पैशातून हे पवित्र कार्य चालू आहे. लातूरच्या पाणीप्रश्नासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे त्याचप्रमाणे, सामाजिक जागरूकता, पर्यावरणीय संवर्धन, शासकीय योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी अक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्य, सांस्कृतिक वारसांचे जतन आणि संवर्धन यासाठी त्यांनी कार्य केले आहे. सदर अक्का फाउंडेशन हे अरविंद यांच्या नियोजन व कार्यकुशलतेचा महत्वाचा भाग आहे.
भाऊ : श्री. संभाजी पाटील निलंगेकर (आमदार, निलंगा विधानसभा मतदारसंघ) हे निलंगा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून मराठवाडा आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळेपणाचा ठसा उमटवणारे अभ्यासू व्यक्तिमत्व होय. बालपणीपासून वडीलांचे आणि आईचे जनसेवेचे कार्य जवळून अनुभवले असल्याने जनतेच्या समस्यांची ओळख, त्यांच्याविषयी संवेदनशीलता आणि सेवा कार्याचे संस्कार त्यांच्यामध्ये आहेत. समाज सेवेच्या वातावरणात जडणघडण झाल्याने जनतेच्या प्रश्नांची आणि त्यावरील उपायांची जाण असणारा लोकनेता असा नावलौकिक. अत्यंत तरुण तडफदार उच्चशिक्षित युवा नेतृत्व. कमी वयामध्ये तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊन विधानसभा सदस्य तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री या भूमिकेतून घेतलेल्या अभिनव निर्णयांमुळे देशात नावलौकिक आहे.