Jump to content

अरविंद गोखले


अरविंद विष्णू गोखले .
जन्म १९ फेब्रुवारी १९१९
इस्लामपूर
मृत्यूऑक्टोबर २४, १९९२
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकथा
वडील विष्णू गोखले

अरविंद विष्णू गोखले (जन्म : इस्लामपूर, १९ फेब्रुवारी १९१९; - २४ ऑक्टोबर १९९२) हे एक मराठी लघुकथा लेखक होते. त्यांचे. शिक्षण पुणे व मुंबई येथे बी.एस्‌सी. पर्यंत (१९४०) झाल्यावर १९४१ मध्ये त्यांना ‘दक्षिणा फेलो’ होण्याचा बहुमान प्राप्त झाला.[ संदर्भ हवा ] पुढे त्यांनी दिल्लीच्या ‘इंपीरिअल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’मधून सायटोजेनिटिक्सचा अभ्यासक्रम पुरा केला. अमेरिकेतील व्हिस्कॉन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करून त्यांनी एम.एस. ही पदवी मिळविली. १९४३पासून त्यांनी पुण्याच्या शासकीय कृषी महाविद्यालयात संशोधन आणि अध्यापन केले. १९६३नंतर ते मुंबईच्या धरमसी कंपनीत नोकरी करीत होते.[ संदर्भ हवा ]

लेखन

‘हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात इ.स. १९३५मध्ये प्रसिद्ध झाली.[ संदर्भ हवा ] त्यानंतर त्यांनी साडेतीनशेहून अधिक कथा लिहिल्या. त्यांच्या बऱ्याच कथा, नजराणा (१९४४) ते दागिना (१९७२) पर्यंत प्रसिद्ध झालेल्या पंचवीस कथासंग्रहांत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ‘कातरवेळ ’, ‘मंजुळा’, ‘रिक्ता’, ‘कॅक्टस’, ‘विघ्नहर्ती’ ह्या त्यांच्या काही विशेष उल्लेखनीय कथा होत.[ संदर्भ हवा ]

अरविंद गोखले यांच्या अनेक कथांचे युरोपीय व भारतीय भाषांतून अनुवाद झाले आहेत.[ संदर्भ हवा ] स्वतंत्र कथालेखनाखेरीज काही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद त्यांनी केले आहेत; तसेच ना.सी. फडके, वामन चोरघडे, व्यंकटेश माडगूळकर ह्यांच्या निवडक कथांचे संपादन केले आहे. त्यांनी मराठीतील १९५९ ते १९६३मधील निवडक कथांची वार्षिके प्रसिद्ध केली आहेत. ’अमेरिकेस पहावे जाऊन’ हे अरविंद गोखले यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक आहे.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य [ संदर्भ हवा ]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अनवांच्छितमाहितीपरकॉंन्टिनेंटल प्रकाशन
अनामिका१९६१
अमेरिकेस पहावे जाऊनप्रवासवर्णन
अरविंद गोखले यांची कथाकॉंन्टिनेंटल प्रकाशन
अनुवादित, मूळ लेखक - सईद सलीम शाहजादचिनार प्रकाशन
असाही पाकिस्तानप्रवासवर्णनरोहन प्रकाशन
अक्षताकथासन प्रकाशन
आय. सी. ८१४कादंबरीपद्मगंधा प्रकाशन
आले पाकअनुभव कथनश्रीविद्या प्रकाशन
कथाईकथासंग्रहकॉंन्टिनेंटल प्रकाशन
कथांतेपॉप्युलर प्रकाशन
कथाष्टकेकॉंन्टिनेंटल प्रकाशन
केळफूलमेनका प्रकाशन
गंधवार्ताकथासंग्रहपॉप्युलर प्रकाशन
गहिरंकथासंग्रहपाॅप्युलर प्रकाशन
गौडबंगालकथासंग्रहश्रीविद्या प्रकाशन
चाहूलकथासंग्रहकॉंन्टिनेंटल प्रकाशन
जन्मखुणामाहितीपरकॉंन्टिनेंटल प्रकाशन
दागिना१९७२
दि. बा. मोकाशी यांची कथासंपादितसाहित्य अकादमी
देशांतरकथासंग्रहपॉप्युलर प्रकाशन
नजराणा१९४४
निर्यातनाप्रतिमा प्रकाशन
निर्वाणमेनका प्रकाशन
परदेशात शिकायचंयमार्गदर्शनपरमेनका प्रकाशनसहलेखक - विजय लोणकर)
पाकिस्ताननामाप्रवासवर्णनपद्मगंधा प्रकाशन
पाकिस्तानात साठ वर्षेअनुवादित, मूळ लेखक -बी.एम. कुट्टी; सहअनुवादक - विजय लोणकरचिनार प्रकाशन
मंजु़ळापॉप्युलर प्रकाशन
मंडालेचा राजबंदीराजहंस प्रकाशन
माणूस आणि कळसकथासंग्रहश्रीविद्या प्रकाशन
मिथिला१९५९
व्यंकटेश माडगूळकर यांची कथाकॉंटिनेंटल प्रकाशन
अनुभव कथन|कॉंन्टिनेंटल प्रकाशन
शपथकादंबरीकॉंन्टिनेंटल प्रकाशन
शुभाआत्मकथनकॉंन्टिनेंटल प्रकाशन१९६०
संघर्ष बलुचिस्तानचागंधर्ववेद प्रकाशन

[][][]अरविंद गोखले यांच्याविषयी अन्य लेखकांनी लिहिलेली पुस्तके

  • अरविंद गोखले यांच्या लघुकथांचे ’अरविंद गोखले यांची कथा’ या नावाने संकलन करून ते भालचंद्र फडके यांनी संपादित करून प्रकाशित केले आहे.
  • अरविंद गोखले यांच्यावर नीला वसंत उपाध्ये यांनी 'कथाव्रती अरविंद गोखले' नावाचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक लिहिले आहे.
  • त्यांनीच 'अनवट निवडक गोखले' या कथासंग्रहाचे संपादन केले आहे.
  • 'पाच कथाकार' या पुस्तकात वि.स. खांडेकर यांनी अरविंद गोखलें आणि स्वतःसहित अन्य तीन लेखकांच्या कथा संपादित करून प्रकाशित केल्या आहेत.

पुरस्कार[ संदर्भ हवा ]

  • अरविंद गोखले यांच्या अनामिका, मिथिला आणि शुभा या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली आहेत.
  • त्यांच्या ’गंधवार्ता’ ह्या कथेस एन्‌काउंटर ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंग्रजी मासिकाचे आशियाई-अरबी-आफ्रिका कथास्पर्धेचे पारितोषिक मिळाले होते.

संदर्भ

  1. ^ अरविंद गोखले यांचे कथाविश्व - लेखक :डाॕ.संस्कृती आवलगावकर,प्रतिमा प्रकाशन ,पुणे
  2. ^ a b आवलगावाकर, संस्कृती (2015). [??? अरविंद गोखले यांचे कथाविश्व] Check |दुवा= value (सहाय्य). Pune: प्रतिमा प्रकाशन,पुणे.