जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये अरवलीचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृष्ट्या हा पर्वत महत्त्वाचा आहे. अंदाजे 600 ते 3500 कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली. आरवली पर्वतरांग ही सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे या डोंगर रांगेत गुरू शिखर हे सर्वात उंच शिखर आहे या शिखराची उंची 1722 इतकी आहे
राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरील माउंट अबू (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व ते थंड हवेचे ठिकाणही आहे.
पर्यावरण
हा पर्वत राजस्थानकडे वाहणारे मोसमी वारे अडवतो, त्यामुळे अरवली पर्वताच्या पूर्व भागात बऱ्यापैकी पाऊस पडतो मात्र अरवलीच्या पर्ज्यन्यछायेतील पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. अरवली पर्वतात अनेक जंगले आहेत, ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील असून येथे वन्य जीववैविध्य असून वन्यजीवांची संख्या लक्षणीय आहे. रणथंभोर, सारिस्का ही काही प्रसिद्ध अभयारण्य अरवली पर्वतात आहेत. राजस्थानातील काही प्रसिद्ध शहरे (उदा. उदयपूर, चित्तोडगढ, जयपूर, सवाई माधोपुर) अरवली पर्वताच्या सानिध्यात येतात.
प्राचीन साहित्यातील उल्लेख
महाभारतातील मत्स्य देश हा अरवली पर्वतरागांमध्ये असल्याचे मानले जाते.