Jump to content

अमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक

अमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक किंवा इंडियन अमेरिकन हे अमेरिकेचे नागरिक असलेले आणि भारतीय पूर्वज असलेल्या लोकांना दिलेले नाव आहे.

अमेरिकेत स्वतःला या गटात मोजणारे अंदाजे ३१,८०,०० व्यक्ती आहेत. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येचा साधारण १% असलेला हा गट चीनी अमेरिकन आणि फिलिपिनो अमेरिकन यांच्या मागोमाग तिसऱ्या क्रमांकाचा मोठा वस्तीगट आहे. []

इतिहास

अमेरिकेच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात भारतीयवंशी लोकांना अमेरिकेत येणे तसेच नागरिकत्व मिळणे दुरापास्त होते. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात कायद्यानेच यावर बंदी घातलेली होती. इ.स. १९४६ च्या ल्यूस-सेलर कायद्याने भारतीयांना अमेरिकेत कायमस्वरुपी राहण्यास परवानगी परत मिळाली.[] अमेरिकेत वास्तव्यास आलेल्या भारतीयवंशी लोकांपैकी मोठा भाग भारतेतर देशांतून आला. यांत युनायटेड किंग्डम, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, मलेशिया, सिंगापूर, सुरिनाम, गयाना, फिजी, केन्या, टांझानिया, युगांडा, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच जमैका या देशांचा समावेश होतो.

वस्तीविभागणी

२०१० च्या जनगणनेनुसार[] अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांची लोकसंख्या इ.स. २०००मध्ये १६,७८,७६५ (एकूण लोकसंख्येचा ०.६% भाग) होती तर २०१०मध्ये ती २८,४३,३९१ (०.९%) इतकी झाली.[][][]

जर्सी सिटी, न्यू जर्सीमधील इंडिया स्क्वेर. न्यू जर्सी राज्यात भारतीय वंशाच्या लोकांची दाट वस्ती आहे.[][][][१०]

न्यू यॉर्क महानगर तसेच आसपासच्या भागात ५,९२,८८८ भारतीय वंशाच्या व्यक्ती राहतात. यात न्यू यॉर्क शहर, लॉंग आयलंड, ट्रेंटन, न्यू जर्सी, ब्रिजपोर्ट, कनेटिकट, पाइक काउंटी, पेनसिल्व्हेनिया पर्यंतच्या भागांचा समावेश होतो.[११] अमेरिकेतील शहरांपैकी न्यू यॉर्क शहरात अशा व्यक्तींची लोकसंख्या २,०७,४१४ इतकी सर्वाधिक आहे.[११] भारतीय वंशाच्या व्यक्तींची मोठी संख्या असलेली शहरे अटलांटा, बाल्टिमोर-वॉशिंग्टन, बॉस्टन, शिकागो, डॅलस-फोर्ट वर्थ, डीट्रॉइट, ह्यूस्टन, लॉस एंजेलस, फिलाडेल्फिया, सान फ्रांसिस्को, सान होजे, ओकलंड, डेन्व्हर, इ. आहेत.

दशकानुसार लोकसंख्या

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक.±%
इ.स. १९१० २,५४५
इ.स. १९२० २,५०७ −१%
इ.स. १९३० ३,१३० +२४%
इ.स. १९४० २,४०५ −२३%
इ.स. १९८० ३,६१,५३१ +१४९३२%
इ.स. १९९० ८,१५,४४७ +१२५%
इ.स. २००० १६,७८,७६५ +१०५%
इ.स. २०१० २८,४३,३९१ +६९%

[१२]

नोंद: १९८०पूर्वीचे आकडे "हिंदूवंशीय" लोकांची संख्या दर्शविते.

अमेरिकेतील भारतीयवंशी व्यक्तींची मोठी संख्या असलेली शहरे

अमेरिकेतील महानगरे
क्र. महानगर एकूण लोकसंख्या (२०१०) भारतीयवंशी व्यक्ती (२०१०) % भारतीयवंशी व्यक्ती आशियावंशी व्यक्ती (२०१०)[१३]% आशियावंशी व्यक्ती
न्यू यॉर्क, उत्तर न्यू जर्सी, लॉंग आयलंड 18,897,109526,1332.81,878,2619.9
लॉस एंजेलस, लॉंग बीच, सांता ॲना, कॅलिफोर्निया 12,828,837119,9010.91,884,66914.7
शिकागो, जोलियेट, नेपरव्हिल, इलिनॉय 9,461,105171,9011.8532,8015.6
डॅलस, फोर्ट वर्थ, आर्लिंग्टन, टेक्सास 6,371,773100,3861.6341,5035.4
फिलाडेल्फिया, कॅम्डेन, विल्मिंग्टन, डेलावेर 5,965,34390,2861.5295,7665.0
ह्यूस्टन, शुगरलॅंड, बेटाउन, टेक्सास 5,946,80091,6371.5389,0076.5
वॉशिंग्टन डी.सी., आर्लिंग्टन, व्हर्जिनिया, अलेक्झांड्रिया, व्हर्जिनिया 5,582,170127,9632.3517,4589.3
मायामी, फोर्ट लॉडरडेल, पॉंपानो बीच, फ्लोरिडा 5,564,63541,3340.7125,5642.3
बॉस्टन, कॅंब्रिज, क्विन्सी, मॅसेच्युसेट्स 4,552,40262,5981.4294,5036.5
१० सान फ्रांसिस्को, ओकलंड, फ्रीमॉंट, कॅलिफोर्निया 4,335,391119,8542.81,005,82323.2
११ डीट्रॉइट, वॉरेन, लिवोनिया, मिशिगन 4,296,25055,0871.3141,3163.3
१२ रिव्हरसाइड, सान बर्नार्डिनो, ऑंटारियो, कॅलिफोर्निया 4,224,85123,5870.6259,0716.1
१३ फीनिक्स, ग्लेनडेल, मेसा, ॲरिझोना 4,192,88731,2030.7138,7173.3
१४ सिॲटल, टाकोमा, बेलेव्ह्यू, वॉशिंग्टन 3,439,80952,6521.5392,96111.4
१५ मिनीयापोलिस, सेंट पॉल, ब्लूमिंग्टन, मिनेसोटा 3,279,83329,4530.9188,0185.7
१६ सान डियेगो, कार्ल्सबाड, कॅलिफोर्निया 3,095,31324,3060.8336,09110.0
१७ सेंट लुईस, मिसूरी 2,812,89616,8740.660,0722.1
१८ टॅम्पा, सेंट पीटर्सबर्ग, क्लियरवॉटर, फ्लोरिडा 2,783,24323,5260.880,8792.9
१९ बाल्टिमोर, मेरिलॅंड 2,710,48932,1931.2122,9114.5
२० डेन्व्हर, अरोरा, ब्रूमफील्ड, कॉलोराडो 2,543,48213,6490.594,0053.7
२१ पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया 2,356,28514,5680.641,2381.8
२२ पोर्टलॅंड, व्हॅनकूवर, हिल्सबोरो, ऑरेगन 2,226,00915,1170.7126,9655.7
२३ ओरलॅंडो, किसिमी, सॅनफोर्ड, फ्लोरिडा 2,134,41126,1051.284,8525.0
२४ सिनसिनाटी, मिडलटाउन, ओहायो 2,130,15114,6960.740,4221.9
२५ क्लीव्हलंड, ओहायो 2,077,24014,2150.740,5222.0
२६ कॅन्सस सिटी, मिसूरी 2,035,33411,6460.646,2212.3
२७ सान होजे, सनिव्हेल, सांता क्लारा, कॅलिफोर्निया 1,836,911117,7116.4571,96731.3
२८ इंडियानापोलिस, इंडियाना 1,756,24112,6690.739,5762.3
२९ रिचमंड, व्हर्जिनिया 1,258,25112,9261.039,2653.1
३० हार्टफोर्ड, कनेटिकट 1,212,38118,7641.547,3393.9
३१ रॅले, ड्युरॅम, केरी, उत्तर कॅरोलिना 1,130,49020,1921.849,8624.4
३२ फ्रेस्नो, कॅलिफोर्निया 930,45015,4691.789,3579.6
३३ ब्रिजपोर्ट, स्टॅमफर्ड, नॉरवॉक, कनेटिकट 916,82915,4391.742,2844.6
३४ स्टॉकटन, कॅलिफोर्निया 685,30612,9511.998,47214.4
३५ फेटव्हिल, आर्कान्सा 422,6103,5340.912,9483.06
३६ ट्रेंटन, युइंग, न्यू जर्सी 366,51315,3524.232,7528.9

वरील आकडे स्वतःला पूर्णपणे भारतीयवंशी आणि पूर्णपणे आशियाईवंशी म्हणविणाऱ्या लोकांचे आहेत. यांत मिश्रवंशीय भारतीय तसेच मिश्रवंशीय आशियाई व्यक्तींचा समावेश नाही.

अमेरिकेतील राज्यानुसार भारतीयवंशी व्यक्तींची संख्या

राज्यभारतीयवंशी व्यक्ती (२०००ची जनगणना)भारतीयवंशी व्यक्ती (२०००ची जनगणना)[१४]२०००-२०१० दरम्यान बदललेली टक्केवारी
कॅलिफोर्निया360,392528,17646.6%
न्यू यॉर्क296,056313,6205.9%
न्यू जर्सी169,180292,25672.7%
टेक्सास129,365245,98190.1%
इलिनॉय124,723188,32851.0%
फ्लोरिडा70,740128,73582.0%
व्हर्जिनिया48,815103,916112.9%
पेनसिल्व्हेनिया57,241103,02680.0%
जॉर्जिया46,13296,116108.3%
मेरीलॅंड49,90979,05158.4%
मॅसेच्युसेट्स43,80177,17776.2%
मिशिगन54,65677,13241.1%
ओहायो38,75264,18765.6%
वॉशिंग्टन23,99261,124154.8%
उत्तर कॅरोलिना26,19757,400119.1%
कनेटिकट23,66246,41596.2%
ॲरिझोना14,74136,047144.5%
मिनेसोटा16,88733,03195.6%
इंडियाना14,86527,59885.7%
टेनेसी12,83523,90086.2%
मिसूरी12,16923,22390.8%
विस्कॉन्सिन12,66522,89980.85
कॉलोराडो11,72020,36973.8%
ओरेगन9,57516,74074.8%
दक्षिण कॅरोलिना8,85615,94180.0%
कॅन्सस8,15313,84869.9%
अलाबामा6,90013,03688.9%
केंटकी6,77112,50184.6%
ओक्लाहोमा8,50211,90640.0%
नेव्हाडा5,53511,671110.9%
डेलावेर5,28011,424116.4%
लुईझियाना8,28011,17435.0%
आयोवा5,64111,08196.4%
न्यू हॅंपशायर3,8738,268113.5%
आर्कान्सा3,1047,973156.9%
युटा3,0656,212102.7%
नेब्रास्का3,2735,90380.4%
मिसिसिपी3,8275,49443.6%
वॉशिंग्टन डी.सी.2,8455,21483.3%
ऱ्होड आयलंड2,9424,65358.2%
न्यू मेक्सिको3,1044,55046.6%
पोर्तो रिकोN/A3,523N/A
वेस्ट व्हर्जिनिया2,8563,30415.7%
हवाई1,4412,20152.7%
आयडाहो1,2892,15267.0%
मेन1,0211,95991.9%
नॉर्थ डकोटा8221,54387.7%
व्हरमॉंट8581,35958.4%
अलास्का7231,21868.5%
साउथ डकोटा6111,15288.5%
मॉंटाना37961863.1%
वायोमिंग35458966.4%
एकूण1,678,7652,843,39169.4%

सामाजिक व आर्थिक आकडेवारी

भारत सोडून जगभर पसरलेल्या भारतीयवंशी लोकांपैकी दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक व्यक्ती अमेरिकेत राहतात

इ.स. २००६मध्ये १२,६६,२६४ व्यक्तींनी अमेरिकेत कायदेशीररीत्या स्थलांतर केले. पैकी ५८,०७२ व्यक्ती भारतातून आल्या. २००० आणि २००६ दरम्यान ४,२१,०००६ व्यक्ती भारतातून अमेरिकेत कायमस्वरुपी राहण्यास आल्या. १९९०-१९९९ या कालखंडात ही संख्या ३,५२,२७८ होती.[१५] १९९० ते २००० या दशकात भारतातून आलेल्या व्यक्तींची संख्या १०५.८७%नी वाढली. यात कालखंडातील अमेरिकेची लोकसंख्या ७.५%नी वाढली. आशियाईवंशी अमेरिकनांपैकी भारतीयवंशीयांची संख्या १६.४% आहे. २०००साली अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयवंशीयांपैकी १०,०७,००० व्यक्ती अमेरिकेबाहेर जन्मलेल्या होत्या.

ड्यूक युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली यांच्या पाहणीनुसार १९९५ ते २००५ या दहा वर्षांत भारतीय अमेरिकनांनी स्थापन केलेल्या तांत्रिक कंपन्याची संख्या याच काळातील ब्रिटिश, चीनी, तैवानी आणि जपानी अमेरिकनांनी स्थापन केलेल्या एकूण कंपन्यांच्या संख्येपेक्षा जास्त होती.[१६] युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलीच्या स्वतंत्र पाहणीनुसार सिलिकॉन व्हॅलीमधील एक तृतियांश अभियंते भारतीयवंशी आहेत तर तेथील उच्चतंत्रज्ञान कंपन्यांपैकी ७% कंपन्यांचे उच्चाधिकारी भारतीयवंशी आहेत.

आर्थिक

अमेरिकेतील २०१० च्या जनगणनेनुसार तेथील वांशिक गटांपैकी भारतीय अमेरिकनांचे दरघरटी उत्पन्न सर्वाधिक होते. कार्यसक्षम भारतीय अमेरिकनांपैकी ७२.३% व्यक्ती नोकरीधंद्यात असून त्यांपैकी ५७.३% व्यक्ती व्यवस्थापकीय आणि व्यावसायिक काम करतात.[१७] इतर अमेरिकनांतील ही टक्केवारी ३५.९% आहे.[१८] अमेरिकन असोसियेशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजन या संस्थेच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत भारतीयवंशाचे अंदाजे ३५,००० डॉक्टर आहेत.[१९] २००२ साली भारतीयवंशी अमेरिकन २,२३,००० कंपन्याचे मालक होते व त्याद्वारे ८८ अब्ज अमेरिकन डॉलरचे उत्पन्न ६,१०,००० व्यक्तींना रोजगार मिळत होता.[२०]

२००९ सालचे मिडीयन दरघरटी उत्पन्न
वांशिकता दरघरटी उत्पन्न
भारतीय $८८,५३८[२१]
फिलिपिनो $७५,१४६[२२]
चीनी $६९,०३७[२३]
जपानी $६४,१९७[२४]
कोरियन $५३,०२५[२५]
एकूण अमेरिकेची जनता $५०,२२१

शैक्षणिक

अमेरिकेतील वांशिकगटांपैकी भारतीयवंशी अमेरिकन शैक्षणिक व आर्थिक प्रगतीमध्ये अग्रेसर आहेत.[२६] यांच्यातील ७१% व्यक्तींकडे शैक्षणिक पदव्या आहेत. अमेरिकेतील आशियाईवंशीयांत हे प्रमाण ४४% तर एकूण अमेरिकनांत हे प्रमाण २८% आहे. जवळजवळ ४०% भारतीयवंशी अमेरिकनांकडे शैक्षणिक उच्चपदव्या आहेत. एकूण अमेरिकनांपेक्षा हे प्रमाण पाचपट आहे.[२७][२८]

अमेरिकनांची शैक्षणिक पातळी: २०१०[२९]
(वय २५ किंवा अधिक वर्षे)
वांशिकता शैक्षणिक पदवी प्रमाण
भारतीय ७१.१%
चीनी ५२.४%
फिलिपिनो ४८.१%
एकूण अमेरिकन जनता २८.०%

संस्कृती

धर्म

अमेरिकेतील निवडक भारतीय धार्मिकस्थळे
बॅप्स श्री स्वामीनारायण मंदिर, शिकागो
सान होजेचा गुरुद्वारा साहिब
जैन केंद्र, फीनीक्स

अमेरिकेतील भारतीयवंशी लोकांत हिंदू (५१%), मुस्लिम (१०%), ख्रिश्चन (१८% - पैकी प्रोटेस्टंट ११%, कॅथोलिक ५%, इतर ख्रिश्चन ३%), शीख (५%), जैन (२%), बौद्ध, पारसी, ज्यू व इतर अनेक धर्मीय व्यक्ती आहेत. १०% व्यक्ती आपल्याला निधर्मी किंवा नास्तिक म्हणवतात. यांतील बहुतांश आपल्या पूर्वजांचा धर्म पाळतात. कॅलिफोर्नियात स्टॉकटन शहरात इ.स. १९१२मध्ये बांधलेला गुरुद्वारा हे पहिले भारतीय धार्मिकस्थळ होते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Race Reporting for the Asian Population by Selected Categories: 2010". २०१२-०१-१७ रोजी पाहिले.
  2. ^ "Roots in the Sand - the Archives". २०१३-०२-०७ रोजी पाहिले.
  3. ^ http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=DEC_10_DP_DPDP1&prodType=table
  4. ^ "Census shows growth among Asian Indians".
  5. ^ "Census: Asian-Indian Population Explodes Across U.S. | Divanee - South Asian news and entertainment". 2014-01-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-०२-०७ रोजी पाहिले.
  6. ^ http://losangeles.pointslocal.com/news/2011/05/13/losangeles/320413/indian-american-population-is-fastest-growing-minority-group Archived 2013-05-14 at the Wayback Machine. पॉइंट्सलोकल.कॉम
  7. ^ "इयरबूक ऑफ इमिग्रेशन स्टॅटिस्टिक्स: २०१२ सप्लिमेंटल टेबल २". 2013-05-26 रोजी पाहिले.
  8. ^ "इयरबूक ऑफ इमिग्रेशन स्टॅटिस्टिक्स: २०१२ सप्लिमेंटल टेबल २". 2013-05-26 रोजी पाहिले.
  9. ^ "इयरबूक ऑफ इमिग्रेशन स्टॅटिस्टिक्स: २०१२ सप्लिमेंटल टेबल २". २०१३-०५-२६ रोजी पाहिले.
  10. ^ "इयरबूक ऑफ इमिग्रेशन स्टॅटिस्टिक्स: २००९ सप्लिमेंटल टेबल २". २०१३-०५-२६ रोजी पाहिले.
  11. ^ a b "ACS DEMOGRAPHIC AND HOUSING ESTIMATES Geographies Table DP05 2011 American Community Survey 1-Year Estimates". 2013-06-05 रोजी पाहिले.
  12. ^ "U.S. Census Bureau Delivers Illinois' 2010 Census Population Totals, Including First Look at Race and Hispanic Origin Data for Legislative Redistricting". 2011-02-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०११-०२-२० रोजी पाहिले.
  13. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; issuu.com नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  14. ^ http://www.usindiafriendship.net/census/statepop.htm Archived 2012-11-06 at the Wayback Machine.
  15. ^ Yearbook of Immigration Statistics: Fiscal Years 1820 to 2006
  16. ^ असिसी, फ्रांसिस सी. "News & Analysis: Skilled Indian Immigrants Create Wealth for America". 2011-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१०-०७-१७ रोजी पाहिले.
  17. ^ Indian-Americans: A Story of Achievement
  18. ^ "American Factfinder". २०१२-०५-१८ रोजी पाहिले.
  19. ^ "Indian Americans in New Hampshire". 2010-04-27 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २०१२-०३-२६ रोजी पाहिले.
  20. ^ Asian Indian Summary of Findings
  21. ^ "United States - Selected Population Profile in the United States (Asian Indian alone or in any combination)". 2011-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-30 रोजी पाहिले.
  22. ^ United States - Selected Population Profile in the United States (Filipino alone or in any combination)[permanent dead link]
  23. ^ "United States - Selected Population Profile in the United States (Chinese alone or in any combination)". 2011-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-30 रोजी पाहिले.
  24. ^ United States - Selected Population Profile in the United States (Japanese alone or in any combination)[permanent dead link]
  25. ^ United States - Selected Population Profile in the United States (Korean alone or in any combination)[permanent dead link]
  26. ^ "USA�s best: Indian Americans top community - World - IBNLive". 2009-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-०२-०७ रोजी पाहिले.
  27. ^ The Indian American Centre for Political Awareness.
  28. ^ "सीआयए - द वर्ल्ड फॅक्टबूक - इंडिया". 2008-06-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-30 रोजी पाहिले.
  29. ^ 2008-2010 American Community Survey 3-Year Estimates