Jump to content

अमेरिका (पुस्तक)

अमेरिका या पुस्तकातून अनिल अवचटांनी अमेरिकेचे वेगळे स्वरूप वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे..

अमेरिकेचा इतिहास फारसा जुना नाही. तरीसुद्धा या पुस्तकात अन्याय, शोषणाची बरीचशी उदाहरणे आहेत. विशेषतः मेक्सिकन मजुरांवर होत असलेले अन्याय व अत्याचार. कृष्णवर्णीयांचे होणारे अपमान, स्थानिक अमेरिकन तथा रेड इंडियन लोकांवर केलेली मुजोरगिरी आणि त्यांच्या अस्तित्वावर केलेला हल्ला, इत्यादी.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिले आहे की 'अमेरिकेत करीयर करण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक तरुण/तरुणीने हे पुस्तक निदान एकदा तरी जरूर वाचावे.'