Jump to content

अमेरिकन सामोआ राष्ट्रीय फुटबॉल संघ

अमेरिकन सामोआ राष्ट्रीय फुटबॉल संघ (सामोअन भाषा:Au soka Amerika Sāmoa) हा अमेरिकन सामोआचे असोसिएशन फुटबॉल मध्ये प्रतिनिधित्व करतो. याचे नियंत्रण फुटबॉल फेडरेशन अमेरिकन सामोआकडे आहे. ही संस्था त्या क्षेत्रात देशांचे प्रतिनिधित्व करते. अमेरिकन सामोआचे गृहमैदान पागो पागोमधील व्हेटरन्स मेमोरियल स्टेडियम हे आहे.