Jump to content

अमेरिकन गॉथिक

अमेरिकन गॉथिक चित्र

अमेरिकन गॉथिक हे ग्रॅंट वुड या चित्रकाराचे एक प्रसिद्ध चित्र आहे. हे चित्र सद्ध्या आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील संग्रहात मांडले आहे. 'अमेरिकन गॉथिक हाउस व त्यात राहणारी माणसे' ही या चित्रामागील प्रेरणा होती. [] याचित्रात एक वृद्ध शेतकरी व त्याची घरकाम करणारी अविवाहित मुलगी दाखविली आहे.[] या चित्रासाठी वुडची बहीण व त्यांचा दातांचा डॉक्टर मॉडेल म्हणून उभे राहिले होते. चित्रातील मुलगी १९व्या शतकातील कलोनियल अमेरिकेतील पेहराव करून आहे. या चित्रात त्या काळातील पुरूष व स्त्री त्यांच्या रूढ भूमिकांमध्ये दाखविले आहेत. पुरूषाच्या हातात तीन दातांचा कोयता (pitchfork) आहे जो शारिरिक कष्टाचे प्रतिक म्हणून दाखविला आहे, तर मुलीने फुला-फुलांचा स्वेटर घातला आहे.

हे चित्र २०व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध चित्रांमधील एक आहे व अनेक माध्यमांमध्ये ते चित्र अथवा त्याची विडंबना वापरण्यात आली आहे.

संदर्भ

  1. ^ Fineman, Mia, The Most Famous Farm Couple in the World: Why American Gothic still fascinates., Slate,८ जून २००५
  2. ^ "About This Artwork: American Gothic". The Art Institute of Chicago. 2010-05-28 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २० जून २०१० रोजी पाहिले.