Jump to content

अमृता खानविलकर

अमृता खानविलकर
जन्मअमृता राजू खानविलकर
नोव्हेंबर २३, इ.स. १९८४
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट),
सूत्रसंचालन (टीव्ही)
कारकीर्दीचा काळ इ.स. २००४ - चालू
भाषामराठी (स्वभाषा)
मराठी, हिंदी (अभिनय)‌
प्रमुख चित्रपट गोलमाल
साडे माडे तीन
प्रमुख टीव्ही कार्यक्रम कॉमेडी एक्सप्रेस
वडील राजू खानविलकर
आई गौरी खानविलकर
पती
हिमांशु मल्होत्रा (ल. २०१५)

अमृता खानविलकर (नोव्हेंबर २३, इ.स. १९८४; पुणे, महाराष्ट्र - हयात) ही मराठी अभिनेत्री असून तिने मराठीहिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिने मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे.

जीवन

अमृता खानवलकर ही मूळची मुंबई आहे. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कुलात झाले[]; तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात झाले.

कारकीर्द

अमृता खानविलकर हिची कारकीर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या इ.स. २००४मधील "झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज" या गुणवत्ता-शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली. यात तिने तिसरा क्रमांक पटकावला [ संदर्भ हवा ]. त्यानंतर सहारा वन दूरचित्रवाहिनीवरील "अदा" या मालिकेत तिला भूमिका मिळाली. तिने झी म्युझिक वाहिनीवरील "बॉलिवुड टुनाइट" या चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ई टीव्ही मराठीवरील "कॉमेडी एक्सप्रेस" (इ.स. २०१०) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिने केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या पहिल्या कालखंडात तिने सुमारे साडेतीनशे भागांमध्ये संचालनाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर काही काळाच्या विरामानंतर जुलै इ.स. २०१२मध्ये तिने "कॉमेडी एक्सप्रेस" कार्यक्रमात सूत्रसंचालनासाठी पुनरागमन केले [] [].

चित्रपट-कारकीर्द

वर्ष (इ.स.)चित्रपटभाषाभूमिकाटिप्पणी
इ.स. २००६गोलमालमराठीपूर्वा, अपूर्वाजुळ्या व्यक्तिरेखा
इ.स. २००७मुंबई साल्साहिंदीनेहा
साडे माडे तीनमराठीमधुरा
हॅटट्रिक
इ.स. २००८कॉंट्रॅक्टदिव्या
फूंकहिंदीआरतीइ.स. २००९ च्या मॅक्स स्टारडस्ट पुरस्कारांतर्गत "एक्सायटिंग न्यू फेस" पुरस्कारासाठी नामांकित
दोघात तिसरा आता सगळे विसरामराठीपाहुणी कलाकार
इ.स. २००९गैरमराठीनेहा
बोम्मयीतमिळ"फूंक" या हिंदी चित्रपटाची तमिळ पुनर्निर्मिती
इ.स. २०१०नटरंगमराठी"आता वाजले की बारा" या गाण्यावरील नृत्यामध्ये प्रमुख सहभाग
फूॅंक २हिंदीआरती"फूॅंक" मालिकेतला दुसरा चित्रपट
फिल्लम सिटीहिंदीमालतीनिर्मित्योत्तर प्रक्रियेत
इ.स. २०११अर्जुनमराठीअनुष्का
झकासमराठीमंजुळा
धूसरमराठी
फक्त लढ म्हणामराठी पाहुणी कलाकार
इ.स. २०१२सतरंगी रेमराठीआरजे अलीशा
शाळामराठीपरांजपे बाई
आयना का बायनामराठीशिवानी
इ. स. २०१३ हिम्मतवालाहिंदी मराठी मुलगी "धोका धोका" या गाण्यावरील नृत्यामध्ये सहभाग
इ.स. २०१५ बाजीमराठी गौरी
वेलकम   जिंदगीमराठी मीरा
कट्यार  काळजात  घुसलीमराठी झरीना
इ. स. २०१६ वन वे तिकीटमराठी शिवानी
इ. स. २०१७


बस स्टॉपमराठी
इ. स. २०१८ राझीहिंदी मुनीरा सहाय्यक व्यक्तिरेखा
डॅमेजहिंदी लविना
सत्यमेव जयतेमराठी सरिता
आणि... डॉ. काशीनाथ घाणेकरमराठी संध्या पाहुणी कलाकार
इ. स. २०१९ चोरीचा मामलामराठी श्रद्धा
मलंगहिंदी टेरेसा रोद्रिगेझ

संदर्भ व नोंदी

  1. ^ धुरी, संजीवनी. "करामती : बचपन के दिन [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २७ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ "पुन्हा एक्सप्रेस मध्ये". 2012-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "पुन्हा कॉमेडीच्या 'एक्स्प्रेस'मध्ये चढणार अमृता खानविलकर". २७ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे