अमृतसर शताब्दी एक्सप्रेस
१२०१३/१२०१४ अमृतसर शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक जलद प्रवासी सेवा ( सुपर फास्ट एक्सप्रेस ) आहे. शताब्दी एक्सप्रेस ह्या प्रतिष्ठित श्रेणीमधील एक असलेली ही गाडी पंजाबच्या अमृतसर ते नवी दिल्ली दरम्यान दर दिवशी धावते. या ट्रेनचा न्यू दिल्ली ते अमृतसर जंक्शनचा 12013 हा क्रमांक आणि अमृतसर जंक्शन ते न्यू दिल्ली या ट्रेनचा 12014 हा क्रमांक आहे.[१] या ट्रेनचा निर्गमन स्थानक ते आगमन स्थानक प्रवास 448 किमी(278मैल) आहे आणि त्यामध्ये 6 थांबे आहेत. क्रमांक 12013 ही न्यू दिल्ली अमृतसर ट्रेन तिच्या प्रवासासाठी 6 तास 5 मिनिटे आणि क्रमांक 12014 ही ट्रेन अमृतसर ते न्यू दिल्ली या प्रवासासाठी 6 तास 15 मिनिटे वेळ घेतात. या ट्रेनचा विश्रांतीचे वेळेसह सरासरी तासी कमाल 140 किमी(87मैल) आणि किमान 72.65 किमी (45मैल) वेग आहे.
ट्रेन मार्ग, वेळ व कोड
क्रं. | रेल्वे स्थानक नाव | आगमन | निर्गमन | विराम वेळ | प्रवास(किमी) | वेळ | मार्ग |
---|---|---|---|---|---|---|---|
1 | नवी दिल्ली (NDLS) | सुरुवात | 16.30 | 0 | 0 | 1 | 1 |
2 | अंबाला (UBM) | 19.05 | 19.07 | 2मी. | 199 किमी | 1 | 1 |
3 | सरहिंद-फतेहगढ (SIR) | 19.46 | 19.48 | 2मी. | 252 की.मी | 1 | 1 |
4 | लुधियाना (LDH) | 20.40 | 20.43 | 3मी. | 312 की.मी | 1 | 1 |
5 | फगवारा (PGW) | 21.10 | 21.12 | 2मी. | 348 की.मी | 1 | 1 |
6 | जालंधर (JUC) | 21.34 | 21.36 | 2मी. | 369 की.मी | 1 | 1 |
7 | बियास (BEAS) | 22.05 | 22.07 | 2मी. | 406 की.मी | 1 | 1 |
8 | अमृतसर जंक्शन (ASR) | 22.45 | शेवट | 0 | 448 की.मी | 1 | 1 |
ही ट्रेन क्रं.12013/14 अमृतसर शताब्दी एक्सप्रेस ट्रेन जालंधर, लुधियाना जंक्शन, अंबाला कॅंटॉन्मेंट ते न्यू दिल्ली या मार्गावर धावते.[२]
या रेल्वे मार्गाचे पूर्ण विध्युतीकरण झालेले असल्याने गाझियाबाद येथील तळा वरील WAP 5 व WAP 7 या इंजिंनाच्या सहायाने ही ट्रेन पूर्ण प्रवास करते.[३]
बोगी व्यवस्था
या ट्रेनला सामान्यतः 2 वातानुकूलित प्रथम वर्ग बोगी, 13 वातानुकूलित आसन यान बोगी, 2 सामान व जनरेटर बोगी असी व्यवस्था आहे. ही ट्रेन लिंक हाफमन बुश ( Linke-Hofmann Busch) चे सहायाने धावते. साधारणपणे भारतीय रेल्वे त्यांच्या अधिकारात प्रवाश्यांच्या मागणी नुसार बोगी व्यवस्थेत वेळोवेळी सुधारणा करते.[४]
सेवा
दिल्ली अमृतसर रेल्वे विभागातील ही अतिशय वेगवान ट्रेन आहे. ट्रेन क्रं. 12029 / 30 या स्वर्ण शताब्दी एक्सप्रेसला या ट्रेन ची बहीण मानली जाते. अमृतसर शताब्दी एक्सप्रेस या ट्रेनला खान पान बोगी जोडलेली नाही पण या ट्रेन मध्ये खान पान व्यवस्था आहे आणि त्या खर्चाचा समावेश प्रवाशी भाड्यात आहे.
संदर्भ
- ^ "शताब्दी ट्रेन नेमस विथ डिटेल्स" (इंग्लिश भाषेत). 2013-07-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १०-०२-२०१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "अमृतसर शताब्दी एक्सप्रेस ट्रेन १२०१३" (इंग्लिश भाषेत). 2015-12-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १०-०२-२०१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "अमृतसर शताब्दी एक्सप्रेस ट्रेन एक्सपीरीअंस" (इंग्लिश भाषेत). १०-०२-२०१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "अमृतसर,कालका शताब्दी डिलेयड ॲज गुड् ट्रेन डिटेल्स" (इंग्लिश भाषेत). १०-०२-२०१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)