अमृतसर जंक्शन रेल्वे स्थानक
अमृतसर भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | अमृतसर, पंजाब |
गुणक | 31°37′58″N 74°52′02″E / 31.63278°N 74.86722°E |
मार्ग | अंबाला-अटारी मार्ग अमृतसर-पठाणकोट मार्ग |
फलाट | ६ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८६२ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | ASR |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | उत्तर रेल्वे |
स्थान | |
अमृतसर जंक्शन हे पंजाबच्या अमृतसर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले अमृतसर पंजाबातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. १९७६ साली भारत-पाकिस्तान देशांदरम्यान अमृतसर-लाहोर समझौता एक्सप्रेस येथूनच चालू झाली होती. सध्या दिल्ली, मुंबई व इतर सर्व प्रमुख भारतीय शहरांसाठी येथून थेट प्रवासी गाड्या सुटतात.
प्रमुख रेल्वेगाड्या
- अमृतसर−मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- अमृतसर-वांद्रे टर्मिनस पश्चिम एक्सप्रेस
- अमृतसर-मुंबई सेंट्रल सुवर्णमंदिर एक्सप्रेस
- अमृतसर-नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस
- अमृतसर−सियालदाह अकाल तख्त एक्सप्रेस
- अमृतसर-बिलासपूर छत्तीसगढ एक्सप्रेस
- अमृतसर−नांदेड सचखंड एक्सप्रेस