Jump to content

अमृत सूर्यानंद महाराज


स्वामी अमृतसूर्यानंद महाराज (इ.स. १९५२:पोर्तुगाल - ) हे पोर्तुगाल देशाचे योगगुरू आहेत. ते पोर्तुगीज योगमहासंघाचे अध्यक्ष आहेत. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन पाळावा ही नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली केलेल्या सूचनेच्या कित्येक वर्षे आधी, म्हणजे २००१ सालापासून, पोर्तुगालमधील लिस्बन येथे, सूर्यानंदांच्या सूचनेनुसार, योगदिन पाळला जात होता.

वीस वर्षे वयाचे असताना सूर्यानंदांनी हृषीकेश येथील शिवानंद आश्रमाचे कृष्णानंद यांच्याकडून योगाचे धडे घेतले. बंगलोरच्या स्वामी विवेकानंद योग अनुसाधन संस्थानचे कुलगुरू एच.आर. नरेंद्र यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमृतसूर्यानंदांच्या योगदिनाची कल्पना सांगितली. मोदींना ती पसंत पडल्याने त्यांनी युनोमध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन पाळावा असा ठराव पास करून घेतला, आणि त्याप्रमाणे पहिला योगदिन २१ जून २०१५ला साजरा झाला.

स्वामी अमृतसूर्यानंद महाराज यांनी २०१५ सालापर्यंत पन्‍नास योग कार्यक्रम घडवून केले आहेत, .आणि अनेक योग शिक्षक घडवले आहेत. त्यांनी प्रगत योगसाधनेसाठी ’तांडव’, ध्यानधारणेसाठी ’शंकरा’ आणि मनुष्य विकास तंत्राच्या प्रसारासाठी ’माया’ आणि मंत्रोच्चारासाठी ’ओंकार’ असे नाट्यमंच स्थापन केले आहेत.

अमृतसूर्यानंद हे योग सांख्य परिषदेचे अध्यक्ष आहेत.

सूर्यानंद यांचे ग्रंथलेखन

  • चक्रसूत्र
  • कॉस्मो-जेनेसिस ॲन्ड योग-बियॉंड हायड्रोजन

सन्मान आणि पुरस्कार

  • उज्जैन योग जीवन सोसायटीने उज्जैनमध्ये भरवलेल्या ४थ्या आंतरराष्ट्रीय योग सेमिनारचे स्वागताध्यक्षपद (दिनांक ११ जानेवारी २०१४)
  • बंगलोरला ६-१२-२०११ रोजी भरलेल्या आंतरराष्ट्रीय योग परिषदेला पोर्तुगीज योग महासंघाने अमृतसूर्यानंदांकरवी मांडलेला आंतरराष्ट्रीय योगदिनाचा प्रस्ताव संमत झाला होता.
  • भारत सरकारची पद्मश्री