अमूर ससाणा
अमूर ससाणा, लाल पायांचा बाज किंवा अमूर बाज (इंग्लिश: Eastern redlegged falcon, Amur falcon; हिंदी:लाल टांग बाज) हा एक शिकारी पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने कबुतरापेक्षा लहान नर वरील अंगाचा वर्ण राखी. पोपटासारखा राखी करडा असतो. शेपटी व मांडी गण्जासारखा तांबडी. डोळ्यांभोवती कातडी, डोक्याचा मागचा भाग आणि पाय नारंगी तांबड्या रंगाचे असतात. मादी: शेपटीसह वरील अंगाचा वर्ण राखी असतो. त्यावर काळ्या रेषा असतात. माथा गर्द राखी असतो. छातीवर काळे उभे ठिपके असतात. छातीवर व कुशीवर लांब पट्टे असतात.
वितरण
उत्तर भारत, बांगला देश, सिक्कीम, भूतान, नेपाल, मालदीव बेटे ह्या भूप्रदेशांत स्थलांतर करताना दिसतात. क्वचितच एखादा –दुसरा श्रीलंकेत दिसून येतो. मुंबईत भटक्या पक्षाची एक नोंद करतात. उत्तर कचार या भागात एप्रिल ते मे या काळात वीण असते. निवसस्थाने: माळराने आणि गवती कुरणे असा भागात असतात.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली made by