Jump to content

अमिताभ बच्चन

अमिताभ

अमिताभ बच्चन ,आय.आय.एफ.ए. पुरस्कार
जन्म ११ ऑक्टोबर, १९४२ (1942-10-11) (वय: ८१)
अलाहाबाद, भारत
पत्नी नाव जया बच्चन
अपत्ये अभिषेक बच्चन
श्वेता नंदा


अमिताभ बच्चन (जन्म : ११ ऑक्टोबर १९४२)[] हे एक भारतीय चित्रपट अभिनेते, चित्रपट निर्माते, दूरदर्शन सूत्रसंचालक, माजी राजकारणी आहेत जे त्यांच्या हिंदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे.[] १९७०-८० च्या दरम्यान, ते भारतीय चित्रपटातील सर्वात प्रभावी अभिनेते होते ; फ्रेंच दिग्दर्शक फ्रँकोइस ट्रूफॉट यांनी त्यांना "One-man industry" (एक-पुरुष उद्योग) म्हणले.[]

अमिताभ यांचा जन्म 1942 मध्ये अलाहाबाद येथे हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि त्यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांच्या घरी झाला. त्यांचे शिक्षण नैनिताल येथे आणि दिल्ली विद्यापीठातील किरोरी माल महाविद्यालयात झाले. १९६९ मध्ये भुवन शोम या चित्रपटात आवाज निवेदक म्हणून त्यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली. त्यांनी 1970च्या दशकाच्या सुरुवातीला जंजीर, दीवार आणि शोले यांसारख्या चित्रपटांसाठी लोकप्रियता मिळवली. हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना भारताचा "अँग्री यंग मॅन" म्हणून संबोधले गेले.

अमिताभ यांना बॉलीवूडचा शहेनशाह (त्यांच्या 1988 मधील शहेनशाह चित्रपटाच्या संदर्भात), महानायक, स्टार ऑफ द मिलेनियम, किंवा बिग बी म्हणून संबोधले गेले.[] त्यांनी पाच दशकांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत[] 200हून अधिक भारतीय चित्रपटात काम केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी एकूण १६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत, तसेच एकूण ४२ नामांकनांसह, फिल्मफेरमधील कोणत्याही प्रमुख अभिनय श्रेणीमध्ये ते सर्वाधिक नामांकित कलाकार आहेत.

अभिनयासोबतच बच्चन यांनी पार्श्वगायक, चित्रपट निर्माता आणि दूरचित्रवाणी प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले आहे. त्यांनी गेम शो "कौन बनेगा करोडपती"चे अनेक सीझन होस्ट केले आहेत. १९८० च्या दशकात त्यांनी काही काळ राजकारणातही प्रवेश केला होता.

भारत सरकारने त्यांना कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल 1984 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये पद्मभूषण आणि 2015 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. 2007 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान, "नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले.

भारतीय उपखंडाच्या बाहेर त्यांचे आफ्रिका (दक्षिण आफ्रिका, पूर्व आफ्रिका आणि मॉरिशस), मध्य पूर्व (विशेषतः यूएई आणि इजिप्त), युनायटेड किंग्डम, यासह दक्षिण आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी चाहते आहेत. रशिया, कॅरिबियन (गियाना, सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो), ओशनिया (फिजी, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड) आणि युनायटेड स्टेट्स येथेही खूप मोठ्या प्रमाणात बच्चन यांचे चाहते आहेत.[]

प्रारंभीचे जीवन

अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद, उत्तरप्रदेश येथे एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते तर त्यांची आई तेजी बच्चन या मूळच्या फैसलाबाद (पाकिस्तान) येथील हिंदू शीख कुटुंबातील होत्या. अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन (बालसुलभ) या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले. अमिताभ यांच्या वडिलांचे २००३ मध्ये तर आईचे २००७ मध्ये निधन झाले.[ संदर्भ हवा ]

हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे. त्यांच्या आईला रंगभूमीची आवड होती आणि त्यांना एका फिल्ममध्ये भूमिकाही देऊ करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याऐवजी घर सांभाळण्याला प्राधान्य दिले.[ संदर्भ हवा ]

बच्चन अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले. त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले त्यानंतर त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानशाखेतली पदवी संपादन केली. ऐन विशीत कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटाची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय अमिताभ यांनी घेतला. मन का होतो अच्छा मन काना होतो जादा अच्छा.[ संदर्भ हवा ]

अभिनेता

वर्षचित्रपटभूमिकामाहिती
१९६९सात हिंदुस्तानीअन्वर अली अन्वरविजेता, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पदार्पण अभिनेता
भुवन शोम, हिंदी चित्रपटआलोचक (आवाज)
१९७१परवाना, हिंदी चित्रपटकुमार सेन
आनंदडॉ. भास्कर क. बनर्जी/बाबु मोशायविजेता, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
रेशमा और शेरा, हिंदी चित्रपटछोटू
गुड्डी, हिंदी चित्रपटस्वतः
प्यार की कहानी, हिंदी चित्रपटराम चन्द्र
१९७२संजोग, हिंदी चित्रपटमोहन
बिरजू
पिया का घर, हिंदी चित्रपटपाहुणा कलाकार
एक नज़र, हिंदी चित्रपटमनमोहन आकाश त्यागी
बावर्ची, हिंदी चित्रपटसूत्रधार
रास्ते का पत्थर, हिंदी चित्रपटजय शंकर रे
बॉम्बे टू गोवा, हिंदी चित्रपटरवि कुमार
१९७३बड़ा कबूतर, हिंदी चित्रपटपाहुणा कलाकार
बंधे हाथ, हिंदी चित्रपटशमु, दीपकदुहेरी भूमिका
ज़ंजीर, हिंदी चित्रपटइन्स्पेक्टर विजय खन्नानामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
गहरी चाल, हिंदी चित्रपटरतन
अभिमान (हिंदी चित्रपट)सुबीर कुमार
सौदागरमोती
नमक हराम, हिंदी चित्रपटविक्रम (विक्की)विजेता, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
१९७४कुंवारा बाप, हिंदी चित्रपटऑगस्टिनपाहुणा कलाकार
दोस्त, हिंदी चित्रपटआनंदपाहुणा कलाकार
कसौटी, हिंदी चित्रपटअमिताभ शर्मा (अमित)
बेनाम, हिंदी चित्रपटअमित श्रीवास्तव
रोटी कपडा और मकान, हिंदी चित्रपटविजय
मजबूर, हिंदी चित्रपटरवि खन्ना
१९७५चुपके चुपकेसुकुमार सिंहा/परिमल त्रिपाठी
फरार, हिंदी चित्रपटराजेश (राज)
मिली, हिंदी चित्रपटशेखर दयाल
दीवार, हिंदी चित्रपटविजय वर्मानामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार
ज़मीर, हिंदी चित्रपटबादल/चिम्पू
शोले, हिंदी चित्रपटजय (जयदेव)
१९७६दो अंजानेअमित रॉय/नरेश दत्त
छोटी सी बात, हिंदी चित्रपटपाहुणा कलाकार
कभी कभी, हिंदी चित्रपटअमित मल्होत्रानामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार
हेरा फेरी, हिंदी चित्रपटविजय/इंसपेक्टर हिराचंद
१९७७अलाप (हिंदी चित्रपट)अलोक प्रसाद
चरणदासक़व्वाली सिंगेरपाहुणा कलाकार
अमर अकबर ॲंथोनीअन्थोनी गोंजाल्वेसविजेता, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार
शतरंज के खिलाडी, हिंदी चित्रपटसुत्रधार
अदालतधर्मं/ठाकुर धरम चंद, राजूनामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार. <बर/> दुहेरी भूमिका
इमान धरम, हिंदी चित्रपटअहमद राजा
खून पसीना, हिंदी चित्रपटशिवा/तिगेर
परवरीश, हिंदी चित्रपटअमित
१९७८बेशरम, हिंदी चित्रपटराम कुमार चंद्र/
प्रिन्स चन्द्रशेखर
गंगा की सौगंध, हिंदी चित्रपटजीवा
कसमे वादे, हिंदी चित्रपटअमित, शंकरदुहेरी भूमिका
त्रिशूल, हिंदी चित्रपटविजय कुमारनामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार
डॉन, हिंदी चित्रपटदोन/विजयविजेता, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार.
दुहेरी भूमिका
मुकद्दर का सिकंदर, हिंदी चित्रपटसिकंदरनामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार
१९७९द ग्रेट गॅम्बलर, हिंदी चित्रपटजे, इंसपेक्टर विजयदुहेरी भूमिका
गोलमाल, हिंदी चित्रपटस्वतःपाहुणा कलाकार
जुर्माना, हिंदी चित्रपटइंदर सक्सेना
मंजिल, हिंदी चित्रपटअजय चंद्र
मि. नटवरलाल, हिंदी चित्रपटनटवरलाल/अवतार सिंहनामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार & फिल्मफेर सर्वोत्तम पुरूष पार्श्वगायक पुरस्कार
काला पत्थर, हिंदी चित्रपटविजय पल सिंहनामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
सुहाग, हिंदी चित्रपटअमित कपूर
१९८०दो और दो पांचविजय/राम
दोस्ताना, हिंदी चित्रपटविजय वर्मानामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
राम बलराम, हिंदी चित्रपटइन्स्पेक्टर बलराम सिंह
शान, हिंदी चित्रपटविजय कुमार
१९८१चश्मे बद्दूर, हिंदी चित्रपटपाहुणा कलाकार
कमांडर, हिंदी चित्रपटपाहुणा कलाकार
नसीब, हिंदी चित्रपटरवि
बरसात कि एक रात, हिंदी चित्रपटए.सी.पी. अभिजीत रे
लावारिस, हिंदी चित्रपटहीरानामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
सिलसिला, हिंदी चित्रपटअमित मल्होत्रानामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
याराना, हिंदी चित्रपटकिशन कुमार
कालिया, हिंदी चित्रपटकल्लू/कालिया
१९८२सत्ते पे सत्ता, हिंदी चित्रपटरवि आनंद, बाबु
बेमिसालडॉ. सुधीर रॉय, अधीर रॉयनामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार.
दुहेरी भूमिका
देश प्रेमी, हिंदी चित्रपटमास्टर दीनानाथ, राजूदुहेरी भूमिका
नमक हलाल, हिंदी चित्रपटअर्जुन सिंहनामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
खुद्दार, हिंदी चित्रपटगोविन्द श्रीवास्तव/छोटू उस्ताद
शक्ती, हिंदी चित्रपटविजय कुमारनामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
१९८३नास्तिक, हिंदी चित्रपटशंकर (शेरू)/भोला
अंधा कानून (हिंदी चित्रपट)जन. निस्सार अख्तर खाननामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार.
पाहुणा कलाकार
महान, हिंदी चित्रपटराणा रणवीर, गुरू, इन्स्पेक्टर शंकरतिहेरी भूमिका
पुकार, हिंदी चित्रपटरामदास/रोंनी
कुली, हिंदी चित्रपटइकबाल अ. खान
१९८४इन्किलाब, हिंदी चित्रपटअमरनाथ
शराबी, हिंदी चित्रपटविक्की कपूरनामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
१९८५गिरफ्तार, हिंदी चित्रपटइन्स्पे. करण कुमार खन्ना
मर्द, हिंदी चित्रपटराजू "मर्द" टांगेवालानामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
१९८६एक रुका हुआ फैसला, हिंदी चित्रपटपाहुणा कलाकार
आखरी रास्ता (हिंदी चित्रपट)डेव्हिड, विजयदुहेरी भूमिका
१९८७जलवा, हिंदी चित्रपटस्वतःपाहुणा कलाकार
कौन जीता कौन हारा, हिंदी चित्रपटस्वतःपाहुणा कलाकार
१९८८सूरमा भोपालीपाहुणा कलाकार
शहेनशाह, हिंदी चित्रपटइन्स्पेक्टर विजय कुमार श्रीवास्तव
/ शहेंशाह
नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
हीरो हीरालाल (हिंदी चित्रपट)स्वतःपाहुणा कलाकार
गंगा जमुना सरस्वती, हिंदी चित्रपटगंगा प्रसाद
१९८९बटवारा, हिंदी चित्रपटसुत्रधार
तूफान, हिंदी चित्रपटतूफान, शामदुहेरी भूमिका
जादूगरगोगा/गोगेश्वर
मैं आझाद हूॅं, हिंदी चित्रपटआझाद
१९९०अग्नीपथविजय दीनानाथ चौहानविजेता, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्तम अभिनेता व नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
क्रोध, हिंदी चित्रपटपाहुणा कलाकार
आज का अर्जुन (हिंदी चित्रपट)भीमा
१९९१हमTiger/शेखरविजेता, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
अजूबा (हिंदी चित्रपट)अजूबा/अली
इन्द्रजीत, हिंदी चित्रपटइन्द्रजीत
अकेला (हिंदी चित्रपट)इंसपेक्टर विजय वर्मा
१९९२खुदा गवाह, हिंदी चित्रपटबादशाह खाननामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
१९९४इंसानियत, हिंदी चित्रपटइंसपेक्टर अमर
१९९६तेरे मेरे सपनेसुत्रधार
१९९७मृत्युदाता, हिंदी चित्रपटडॉ. राम प्रसाद घायल
१९९८मेजर साबमेजर जसबीर सिंह राणा
बडे मियां छोटे मियां, हिंदी चित्रपटइन्स्पेक्टर अर्जुन सिंह, बडे मियांदुहेरी भूमिका
१९९९लाल बादशाह, हिंदी चित्रपटलाल "बादशाह" सिंह, रणभीर सिंहदुहेरी भूमिका
सूर्यवंशम, हिंदी चित्रपटठाकुर भानु प्रताप सिंह, हीरा सिंहदुहेरी भूमिका
हिंदुस्तान कि कसम (हिंदी चित्रपट)कबीर
कोहराम, हिंदी चित्रपटकाल. बलबीर सिंह सोडी (देवराज हथोड़ा)
& दादा भाई
हॅलो ब्रदर (हिंदी चित्रपट)देवाचा आवाज
२०००मोहब्बतें, हिंदी चित्रपटनारायण शंकरविजेता, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
२००१एक रिश्ता: द बॉॅंड ऑफ लव्हविजय कपूर
लगान, हिंदी चित्रपटसूत्रधार
अक्समनु वर्माविजेता, फिल्मफेअर क्रिटीक्स पुरस्कार, सर्वोत्तम अभिनय व नामांकन, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार
कभी खुशी कभी ग़म, हिंदी चित्रपटयशवोर्धन "यश" रायचंदनामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
२००२ऑंखें, हिंदी चित्रपटविजय सिंह राजपूतनामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
हम किसीसे कम नही, हिंदी चित्रपटडॉ. रस्तोगी
अग्नि वर्षाइन्द्र (गोद)पाहुणा कलाकार
कांटे, हिंदी चित्रपटयश्वर्धन रामपाल/"मेजर"नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
२००३खुशी, हिंदी चित्रपटसुत्रधार
अरमान, हिंदी चित्रपटडॉ. सिद्धार्थ सिंहा
मुम्बई से आया मेरा दोस्त, हिंदी चित्रपटसूत्रधार
बूम, हिंदी चित्रपटबडे मिया
बागबान, हिंदी चित्रपटराज मल्होत्रानामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
फन2श, हिंदी चित्रपटसुत्रधार
२००४खाकी, हिंदी चित्रपटडी.सी.पी. अनंत कुमार श्रीवास्तवनामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
एतबार, हिंदी चित्रपटडॉ. रणवीर मल्होत्रा
रुद्राक्ष, हिंदी चित्रपटसुत्रधार
इन्साफ - थे जस्टिस, हिंदी चित्रपटसुत्रधार
देव, हिंदी चित्रपटडी.सी.पी. देव प्रताप सिंह
लक्ष्य, हिंदी चित्रपटकर्नल सुनील दामले
दीवार, हिंदी चित्रपटमेजर रणवीर कौल
क्यों...! हो गया ना, हिंदी चित्रपटराज चौहान
हम कौन है, हिंदी चित्रपटमेजर फ्रॅंक जॉन विल्यम्स, फ्रॅंक जेम्स विल्सम्सदुहेरी भूमिका
वीर-झारा, हिंदी चित्रपटचौधरी सुमेर सिंहनामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार.
पाहुणा कलाकार
अब तुम्हारे हवाले वतन साथियो (हिंदी चित्रपट)मेजर जनरल अमरजीत सिंह
२००५ब्लॅक, हिंदी चित्रपटदेब्राज सहीदुहेरी-विजेता, फिल्मफेअर बेस्ट ऍक्टर पुरस्कार & फिल्मफेअर क्रिटीक्स पुरस्कार, सर्वोत्तम अभिनय.
विजेता, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्तम अभिनेता
वक्त: द रेस अगेंस्ट टाइम, हिंदी चित्रपटइश्वरचंद्र शरावत
बंटी और बबली, हिंदी चित्रपटडी.सी.पी. दशरथ सिंहनामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
परिणीता, हिंदी चित्रपटसुत्रधार
पहेली, हिंदी चित्रपटगडरियापाहुणा कलाकार
सरकार, हिंदी चित्रपटसुभाष नगरे/"सरकार"नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
विरुद्ध... फॅमिली कम्स फर्स्ट, हिंदी चित्रपटविद्याधर पटवर्धन
रामजी लंडनवाले, हिंदी चित्रपटस्वतःपाहुणा कलाकार
दिल जो भी कहे..., हिंदी चित्रपटशेखर सिन्हा
एक अजनबी, हिंदी चित्रपटसुर्यवीर सिंह
२००६फॅमिली - टाईझ ऑफ ब्लडविरेन सही
डरना जरूरी है,प्रोफेसर
कभी अलविदाना कहना,समरजीत सिंह तलवार (अक. सेक्सी सम)नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
बाबुल, हिंदी चित्रपटबलराज कपूर
२००७एकलव्यः द रॉयल गार्ड,एकलव्य
निशब्द, हिंदी चित्रपटविजय
चीनी कम, हिंदी चित्रपटबुद्धदेव गुप्ता
शूटआउट ऍट लोखंडवाला,दिन्ग्रपाहुणा कलाकार
झूम बराबर झूम, हिंदी चित्रपटसूत्रधारपाहुणा कलाकार
राम गोपाल वर्मा कि आग,बब्बन सिंह
द लास्ट लियर, हिंदी चित्रपटहरीश मिश्र
ॐ शांति ॐ, हिंदी चित्रपटस्वतःपाहुणा कलाकार
२००८जमानत,शिव शंकरओं होल्ड
गॉड तुस्सी ग्रेट हो,पोस्ट-प्रोडक्शन
भूतनाथ,भूतनाथरेलेअसिंग ओं जानेवारी १८, इ.स. २००८
सरकार राज,सुभाष नागरे/"सरकार"रेलेअसिंग ओं फेब्रुवारी ८, इ.स. २००८
एक्सक्लुझन,
युद्ध,अन्नौंसद[]
२००९ दिल्ली -६ [null दादाजी]
पा औरो
२०१० रंण विजय  हर्षवर्धन  मलिक
तीन  पट्टी प्रोफ . वेंकट  सुब्रमणिम
कंदहार लोकनाथ  शर्मा
२०११ बुढ्ढा ... होगा  तेरा बाप विजय  'विज्जु ' मल्होत्रा
२०१५ पिकू भास्कर बॅनर्जी

निर्माता

  • तेरे मेरे सपने, हिंदी चित्रपट (१९९६)
  • मृत्युदाता, हिंदी चित्रपट (१९९७)
  • मेजर साब, हिंदी चित्रपट (१९९८)
  • अक्स, हिंदी चित्रपट (२००१)
  • विरुद्ध... फमिली कम्स फर्स्ट, हिंदी चित्रपट (२००५)
  • फमिली: टाइज ऑफ़ ब्लड, हिंदी चित्रपट (२००६)

पार्श्वगायक

  • मी. नटवरलाल, हिंदी चित्रपट (१९७९)
  • लावारिस, हिंदी चित्रपट (१९८१)
  • नसीब, हिंदी चित्रपट (१९८१)
  • सिलसिला, हिंदी चित्रपट (१९८१)
  • महान, हिंदी चित्रपट (१९८३)
  • पुकार (१९८३)
  • तूफ़ान, हिंदी चित्रपट (१९८९)
  • जादूगर, हिंदी चित्रपट (१९८९)
  • खुदा गवाह, हिंदी चित्रपट (१९९२)
  • अक्स, हिंदी चित्रपट (२००१)
  • कभी ख़ुशी कभी ग़म, हिंदी चित्रपट (२००१)
  • ऑंखें, हिंदी चित्रपट (२००२)
  • अरमान, हिंदी चित्रपट (२००३)
  • बागबान, हिंदी चित्रपट (२००३)
  • देव (२००४)
  • एतबार, हिंदी चित्रपट (२००४)
  • बाबुल, हिंदी चित्रपट (२००६)
  • निशब्द, हिंदी चित्रपट (२००७)
  • चीनी कम, हिंदी चित्रपट (२००७)

दूरवित्रवाणी

  • कौन बनेगा करोड़पति (२०००-२००५) .... संचालक
  • कॉफी विथ करन (२००५) ..... पाहुणा कलाकार
  • रांदेव्हू विथ सिमी गरेवाल (२००६) .... पाहुणा कलाकार
  • टायटन अंताक्षरी (२००७) .... पाहुणा कलाकार

चित्रपट


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Amitabh Bachchan: No resolutions for my birthday". Rediff (इंग्रजी भाषेत). 2022-01-16 रोजी पाहिले.
  2. ^ "Amitabh Bachchan: The biggest film star in the world - News - Films - The Independent". web.archive.org. 2015-02-10. रोजी मूळ पानापासून संग्रहित2015-02-10. 2022-01-16 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ^ D&B Bureau. "Amitabh Bachchan: THE MAN AND THE LEGEND | Diplomacy & Beyond Plus" (इंग्रजी भाषेत). 2022-01-16 रोजी पाहिले.
  4. ^ "Amitabh Bachchan at 73: An ode to the undisputed 'Shahenshah' of Bollywood". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2015-10-11. 2022-01-16 रोजी पाहिले.
  5. ^ "Amitabh Bachchan: A Life in Pictures | BAFTA Guru". web.archive.org. 2011-12-28. रोजी मूळ पानापासून संग्रहित2011-12-28. 2022-01-16 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  6. ^ Willis, Andrew (2004-09-04). Film Stars: Hollywood and Beyond (इंग्रजी भाषेत). Manchester University Press. ISBN 978-0-7190-5645-1.
  7. ^ [१]

बाह्य दुवे

http://static.bafta.org/files/amitabhbachchanbrochure-82.pdf