Buddha Amitābha in Tibetan Buddhism, traditional thangka painting.Portrait of Buddha Amitābha attached in Annotation to the Infinite Life Sutra (Ch. 佛說大乘無量壽莊嚴清淨平等覺經科註)Statue of the Buddha Amitābha (Mongolia, 18th century)Kōtoku-in
अमिताभ हे महायान पंथातील एका बुद्धाचे नाव आहे. सुखावती-व्यूह या प्राचीन बौद्धसूत्रात अमिताभ बुद्धाला ‘सुखावती नावाच्या स्वर्गाच्या पश्चिम दिशेचा अधिष्ठाता’ म्हणले आहे. मोक्षप्राप्तीच्या प्रयत्नात या बुद्धाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. ह्या बुद्धावर श्रद्धा ठेवणाऱ्यास, ह्या बुद्धाला नमन केले किंवा त्यांचे नामस्मरण केले तरी साधकाला आपल्या पापापासून मुक्तात मिळते व स्वर्गात स्थान मिळते, असा समज दृढ झाला.
अमिताभ बुद्ध हा गौतम बुद्धाप्रमाणे ऐतिहासिक व्यक्ती नसून, चीन व जपान मधील अनेक बुद्ध मूर्ती या अमिताभ बुद्ध याच्याच आहेत, असे अभ्यासकांचे मत आहे.